शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

फालेरो सक्षम नाहीत!

By admin | Updated: October 10, 2014 01:38 IST

पणजी : लुईझिन फालेरो यांनी अजून काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रेही स्वीकारलेली नसताना त्यांच्यावर काँग्रेसचे एक असंतुष्ट आमदार माविन गुदिन्हो यांनी जोरदार टीका केली आहे.

पणजी : लुईझिन फालेरो यांनी अजून काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रेही स्वीकारलेली नसताना त्यांच्यावर काँग्रेसचे एक असंतुष्ट आमदार माविन गुदिन्हो यांनी जोरदार टीका केली आहे. फालेरो मुख्यमंत्रिपदी असताना सहा महिनेदेखील सरकार चालवू शकले नव्हते. त्यांच्याकडे सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचे कौशल्य व क्षमताच नाही, अशा शब्दांत गुदिन्हो यांनी टीका केली आहे. माजी मुख्यमंत्री फालेरो यांची सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. फालेरो येत्या मंगळवारी पदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. आपण काँग्रेसपासून दूर गेलेल्या सर्वांना बरोबर आणण्याचे काम करीन व याच कामास आपण प्राधान्य देईन, असे विधान फालेरो यांनी बुधवारी केले होते. त्या पार्श्वभूमीवर बोलताना गुदिन्हो यांनी गुरुवारी फालेरो यांचा समाचार घेतला. गुदिन्हो यांचे मावळते प्रदेशाध्यक्ष जॉन फर्नांडिस यांच्याशीही पटत नव्हते. जॉन यांच्यावरही त्यांनी यापूर्वी टीका केली होती. फालेरो हे मुख्यमंत्रिपदी असताना त्यांच्याकडे तेवीस आमदारांचे संख्याबळ होते; पण त्यांच्याविरुद्ध बंड झाले होते व काँग्रेसचे सरकार सहा महिन्यांत कोसळले होते. त्याची आठवण गुदिन्हो यांनी करून देऊन सर्वांना सोबत घेऊन जाणे फालेरो यांना जमतच नाही, अशी टिप्पणी केली. फालेरो यांच्यावर टीका करणारे गुदिन्हो हे पहिले आमदार ठरले आहेत. गुदिन्हो यांचे भाजपशी सख्य असल्याने काँग्रेस पक्षाने गेल्या काही महिन्यांपासून त्यांना पक्षाच्या सर्व कार्यक्रमांपासून दूर ठेवले आहे. दरम्यान, फालेरो हे मंगळवारी सकाळी ९ वाजता काँग्रेस हाउसमध्ये येऊन पदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. काँग्रेसच्या यापूर्वीच्या उत्तर व दक्षिण गोवा जिल्हा समित्या आता पुनरुज्जीवित केल्या जाणार आहेत, अशी माहिती मिळाली. (खास प्रतिनिधी)