शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

मोपा विमानतळाला पर्यावरणीय मंजुरी, केंद्रीय मंत्री जावडेकरांकडून घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2020 15:01 IST

मोपा येथील विमानतळाचा विषय पूर्वी सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहचला होता. न्यायालयीन खटल्यामुळे विमानतळाचे वर्षभर काम बंद राहिले होते.

पणजी : मोपा येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाला पर्यावरणीय मंजुरी देण्यात आली असल्याची घोषणा केंद्रीय वन व पर्यावरण खात्याचे मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली आहे. जावडेकर यांनी तसे ट्विटरवरून जाहीर केले आहे. आपण गुरुवारी मोपा येथील ग्रीनफिल्ड विमानतळाला पर्यावरण मंजुरी दिली, असे जावडेकर यांनी म्हटले आहे. तसेच यामुळे मोपाच्या पूर्ण भागातील एकूण विकासाला चालना मिळेल व गोव्याच्या पर्यटनालाही बळकटी मिळेल, असा विश्वास जावडेकर यांनी व्यक्त केला आहे.मोपा येथील विमानतळाचा विषय पूर्वी सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहचला होता. न्यायालयीन खटल्यामुळे विमानतळाचे वर्षभर काम बंद राहिले होते. जीएमआर कंपनीला सरकारने हा आंतरराष्ट्रीय विमानतळ उभा करण्याचे काम दिलेले आहे. यापूर्वी सदोष पर्यावरणीय परिणाम अभ्यासामुळे मोपा विमानतळाचा पर्यावरणीय दाखला निलंबित झाला होता. नंतर नव्याने पर्यावरणीय परिणामांचा अभ्यास केला केला. त्यामुळे दाखल्यावरील ते निलंबन मागे घेतले गेले. आता मोपा विमानतळाचे काम नव्याने सुरू होणार आहे. डिसेंबर 2020 मध्ये मोपा विमानतळाच्या पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण करावे असे अगोदर सरकारने ठरविले होते पण आता पहिल्या टप्प्यातील काम 2021 साली पूर्ण होईल असे सरकारचे म्हणणो आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काही महिन्यांपूर्वी राज्याच्या नव्या अर्थसंकल्पातूनही तसे सूतोवाच केले आहे.सरकारने विमानतळासाठी पाच गावातील सुमारे 90 लाख चौरस मीटर क्षेत्रफळाची जागा विमानतळासाठी ताब्यात घेऊन ती कंत्रटदार कंपनीला दिली आहे. विमानतळ बांधताना झाडे कापावी लागतील हा यापूर्वी वादाचा मुद्दा बनला होता. न्यायालयाने त्याची दखल घेऊन काही सूचना व अटींचे पालन करण्यास सरकारला, केंद्रीय पर्यावरण मंत्रलयाला व कंत्रटदार कंपनीलाही सांगितले आहे. अटींचे पालन होते की नाही हे पाहण्याचे काम निरी या संस्थेकडून केले जाणार आहे. जेवढी झाडे कापली जातात, त्याच्या अधिक संख्येने झाडे लावावी लागतील, असे अपेक्षित आहे.

टॅग्स :goaगोवाAirportविमानतळ