शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा पंचायत निवडणुका पक्ष पातळीवर नको

By admin | Updated: February 23, 2015 01:35 IST

सावर्डे : जिल्हा निवडणुका पक्षीय पातळीवर घेण्यासंदर्भातील कायदा रद्द करावा, कूळ व मुंडकार कायद्यात केलेली दुरुस्ती मागे घ्यावी,

सावर्डे : जिल्हा निवडणुका पक्षीय पातळीवर घेण्यासंदर्भातील कायदा रद्द करावा, कूळ व मुंडकार कायद्यात केलेली दुरुस्ती मागे घ्यावी, तसेच जायका प्रकल्पाच्या कंत्राटदाराविरुद्ध पोलिसांत तक्रार नोंदवावी, असे विविध ठराव सावर्डे ग्रामसभेत संमत करण्यात आले. ही सभा सरपंच संजय नाईक यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत सभागृहात झाली. या वेळी उपसरपंच उल्हास नाईक, पंच दीपक सावंत, उन्नती वडार व गटविकास कार्यालयाचे निरीक्षक सुमंत नाईक उपस्थित होते. राज्य सरकारने कूळ व मुंडकार कायद्यांत दुरुस्ती करून बहुजन समाज, तसेच कष्टकरी समाजावर घोर अन्याय केलेला आहे. मामलेदारांकडे जाणारी प्रकरणे काढून ती न्यायालयांत वर्ग केली आहेत, हे अन्यायकारक आहे. भाटकारांच्या जागेत घरे बांधून राहात असलेल्यांवर संक्रांत येण्याची भीती निर्माण झाली आहे. परत एकदा राज्यात भाटकार शाहींचे राज्य आणण्याचा सरकारचा विचार आहे. सरकारने कायद्यांत केलेली ही दुरुस्ती त्वरित मागे द्यावी, असा ठराव आनंद मंगेश नायक यांनी मांडला. त्याला ज्ञानेश्वर नाईक यांनी अनुमोदन दिले. सर्वानुमते हा ठराव संमत करण्यात आला. तसेच जिल्हा पंचायत निवडणुका पक्षीय पातळीवर घेण्याचा निर्णय योग्य नसून त्यामुळे सरकारने हा कायदा रद्द करून पूर्वीप्रमाणे निवडणुका घ्याव्यात, असा ठराव कायतान फर्नांडिस यांनी मांडला. (लो.प्र.)