शिरगावातील देवी लईराई जत्रा : श्रद्धा, परंपरा, भक्तीचा संगम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 08:46 IST2026-04-24T08:45:52+5:302026-04-24T08:46:43+5:30

शिरगावात भरलेली ही जत्रा केवळ धार्मिक उत्सव नसून श्रद्धा, परंपरा आणि भक्तीचा संगम ठरते.

devi lairai jatra in shirgaon a confluence of faith tradition and devotion | शिरगावातील देवी लईराई जत्रा : श्रद्धा, परंपरा, भक्तीचा संगम

शिरगावातील देवी लईराई जत्रा : श्रद्धा, परंपरा, भक्तीचा संगम

डिचोली : दरवर्षीप्रमाणे शिरगाव येथे साजऱ्या होणाऱ्या श्री देवी लईराई जत्रेनिमित्त हजारो भाविकांनी मोठ्या श्रद्धेने देवीचे दर्शन घेत आशीर्वाद घेतला. शांत आणि पवित्र वातावरणासाठी ओळखल्या जाणाऱ्या शिरगावात भरलेली ही जत्रा केवळ धार्मिक उत्सव नसून श्रद्धा, परंपरा आणि भक्तीचा संगम ठरते.

रात्र जसजशी गडद होत जाते, तसतसे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होते. ढोल-ताशांचा गजर, जयघोष आणि मंत्रोच्चारांनी संपूर्ण परिसर दुमदुमून जातो. याच वेळी भाविक देवीवरील अढळ श्रद्धा व्यक्त करत निखाऱ्यांवरून अनवाणी चालण्याचा पारंपरिक आणि थरारक विधी पार पाडतात. देवी लईराई आपल्या भक्तांचे रक्षण करते, असा भाविकांचा ठाम विश्वास असून अग्नीही त्यांच्या भक्तीसाठी आशीर्वादाचा मार्ग ठरतो, अशी धारणा आहे.

या जत्रेत गोव्याच्या सांस्कृतिक वैभवाचेही सुंदर दर्शन घडते. पारंपरिक वेशभूषा, उत्साही मिरवणुका आणि एकात्मतेची भावना यामुळे जत्रेला विशेष रंगत येते. प्रत्येक निखाऱ्यातून भक्तीची ज्वाला आणि देवीवरील अढळ श्रद्धा प्रकट होत असल्याचे चित्र पाहायला मिळते. या पवित्र प्रसंगी श्री देवी लईराई आई सर्वांना सुख, समृद्धी आणि शक्ती प्रदान करो, अशी भावना भाविकांनी व्यक्त केली.

 

Web Title : श्री देवी लईराई जत्रा: आस्था, परंपरा और भक्ति का संगम

Web Summary : शिरगाँव में श्री देवी लईराई जत्रा में हजारों श्रद्धालु उमड़े, जो आस्था, परंपरा और भक्ति का मिश्रण है। भक्तों ने देवी लईराई की सुरक्षा में अटूट विश्वास व्यक्त करते हुए जलते अंगारों पर नंगे पैर चले। जीवंत उत्सव में गोअन संस्कृति, एकता और भक्ति का प्रदर्शन किया गया, समृद्धि और शक्ति के लिए प्रार्थनाएँ की गईं।

Web Title : Shree Devi Lairai Jatra: Faith, Tradition, and Devotion Converge

Web Summary : Thousands gathered at Shirgaon's Shree Devi Lairai Jatra, a blend of faith, tradition, and devotion. Devotees walked barefoot across burning coals, expressing unwavering faith in Devi Lairai's protection. The vibrant celebration showcased Goan culture, unity, and devotion, with prayers for prosperity and strength.