शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

पर्रीकर सरकारवर काँग्रेसचे आरोपपत्र

By admin | Updated: June 27, 2014 01:36 IST

पणजी : येत्या २२ जुलै रोजी विधानसभा अधिवेशनास आरंभ होत असून अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी काँग्रेस पक्ष राज्यातील पर्रीकर सरकारविरुद्ध आरोपपत्र सभापतींना

पणजी : येत्या २२ जुलै रोजी विधानसभा अधिवेशनास आरंभ होत असून अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी काँग्रेस पक्ष राज्यातील पर्रीकर सरकारविरुद्ध आरोपपत्र सभापतींना आणि राज्यपालांनाही सादर करील, असे काँग्रेसचे केंद्रीय निरीक्षक आणि गोव्याचे प्रभारी दिग्विजय सिंग यांनी गुरुवारी काँग्रेस हाउसमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. विरोधी पक्षनेते प्रतापसिंह राणे, खासदार अ‍ॅड. शांताराम नाईक, अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव चेल्लाकुमार यांच्या उपस्थितीत बोलताना सिंग म्हणाले की, येत्या सप्टेंबरमध्ये भाजप सरकार आपल्या कारकिर्र्दीचा पन्नास टक्के काळ पूर्ण करत आहे. वीज क्षेत्रातील विद्यमान सरकारच्या गैरव्यवस्थापनामुळे गोमंतकीय जनता हैराण झाली आहे. वीज समस्या हा गंभीर विषय झालेला आहे. याविरुद्ध काँग्रेस पक्ष आवाज उठवील. विरोधी पक्षनेत्यांकडून सरकारविरुद्ध तपशीलवार आरोपपत्रही सादर केले जाईल. आंदोलनात्मक कार्यक्रमही होतील. यावेळच्या अधिवेशनात काँग्रेसचे आमदार अधिक आक्रमक झालेले पाहायला मिळतील. दिग्विजय सिंग म्हणाले की, येत्या दि. १ आॅक्टोबरपासून काँग्रेसची व्यापक जनसंपर्क मोहीम सुरू होईल. दि. ३१ डिसेंबरपर्यंत ही मोहीम चालेल. प्रत्येक मतदान केंद्राच्या कक्षेतील लोकांची भेट घेतली जाईल व सदस्य नोंदणी मोहीम राबविली जाईल. गद्दारांविरुद्ध कारवाई होणार लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेसमधील ज्या व्यक्तींनी पक्षाविरुद्ध कारवाया केल्या, त्यांच्याविरुद्ध निश्चितच कारवाई केली जाईल, असे सिंग यांनी एका प्रश्नादाखल सांगितले. आम्ही कारवाईसाठी समिती नेमली आहे. पक्षाविरुद्ध ज्यांना हाकलायचे आहे, त्यांच्याबाबतची शिफारस प्रदेश काँग्रेस समितीकडून पक्षश्रेष्ठींकडे केली जाईल, असे ते म्हणाले. सिंग हे गुरुवारी दुपारी गोव्यात दाखल झाले असून सायंकाळी त्यांनी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीवेळी मार्र्गदर्शन केले. आज ते म्हापसा येथील हॉटेल मयुरामध्ये प्रदेश काँग्रेस समितीच्या बैठकीवेळी मार्र्गदर्शन करणार आहेत. दरम्यान, अच्छे दिन आणण्याच्या गोष्टी करत मोदी सरकारने देशावर मोठी रेल्वे तिकीट वाढ लादली आहे, असे सिंग म्हणाले. देशभरातील राज्यपालांना हटविण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने उतावीळपणा दाखविण्याची गरज नव्हती. ज्या राज्यपालांची मुदत संपली आहे, त्यांना बदलायला हवे होते पण ज्यांची मुदत संपलेली नाही, त्यांची मुदत संपेपर्यंत गृह मंत्रालयाने थांबायला हवे होते, असे दिग्वीजय सिंग पत्रकारांच्या एका प्रश्नास उत्तर देताना म्हणाले. (खास प्रतिनिधी)