शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
3
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
4
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
5
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
6
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
7
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
8
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
9
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
10
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
11
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
12
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
13
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
14
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
15
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
16
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
17
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
18
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
19
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
20
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

किनारपट्टीत खंडणीराज

By admin | Updated: December 9, 2014 00:56 IST

पणजी : कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांच्यावर हल्ला करणारा हल्लेखोर हा अनेक राजकारण्यांकडे उठबस असलेला, त्यातही धक्कादायक म्हणजे तो विद्यमान सरकारमधील एका मंत्र्याचा जानी दोस्त आहे.

पणजी : कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांच्यावर हल्ला करणारा हल्लेखोर हा अनेक राजकारण्यांकडे उठबस असलेला, त्यातही धक्कादायक म्हणजे तो विद्यमान सरकारमधील एका मंत्र्याचा जानी दोस्त आहे. किनारपट्टीत अनेक राजकारण्यांनी सध्या धुमाकूळ घातला असून खंडणीबहाद्दर पंच सदस्यांसह अन्य राजकारण्यांनाही लोक कंटाळले आहेत. भाजपचे आमदार लोबो यांच्यावर हल्ला करणारा हल्लेखोर हा विविध प्रकारच्या गोष्टींसाठी हडफडे पंचायत क्षेत्रात व एकूणच कळंगुट मतदारसंघात प्रसिद्ध आहे. हा हल्लेखोर आपल्याकडे एक लाख रुपये मागत होता, असे लोबो सांगतात. लोबो यांच्याकडे तो एक लाख रुपये का मागत होता, हे सखोलपणे व गंभीरपणे जाणून घेण्याचा प्रयत्न जर पोलिसांनी केला तर बऱ्याच गोष्टींवर प्रकाश पडेल, अशी चर्चा हडफडे पंचायत क्षेत्रात सुरू आहे. कळंगुटमध्ये खंडणीराज हे गेल्या पंधरा वर्षांपासून जास्त वाढले आहे. एखादा प्रकल्प येऊ लागला की, त्या प्रकल्पाची पंचायत अडवणूक सुरू करते. मग पंच सदस्य समझोता करतात व पैसे उकळतात. एखाद्या पंचायतीचे जर सात पंच सदस्य असतील, तर त्यापैकी एकटा प्रकल्पाच्या मालकांकडून प्रोटेक्शन मनी मागतो. आपल्याकडे पैसे द्या, आपण ते सर्व पंच सदस्यांना वाटतो व तुम्हाला सर्व प्रकारच्या परवानग्याही मिळवून देतो, असे प्रोटेक्शन मनी मागणारा पंच सदस्य सांगतो. त्यानंतर प्रकल्प मालक पैसे काढून देतो. अशा पद्धतीने व्यवहार सुरू आहेत. मात्र, सर्व पंच सदस्यांना बायपास करून एखाद्या मोठ्या राजकारण्याने स्वत:च प्रोटेक्शन मनी घेतला की, मग वाद सुरू होतात. कळंगुट मतदारसंघात अशा प्रकारचे वाद वाढू लागले आहेत. यापूर्वीही अशा वादांमधून काहीजणांवर हल्ले झालेले आहेत. कळंगुट मतदारसंघात एका हॉटेलसाठी रस्ता बांधण्याकरिता ८० लाख रुपये काही राजकारण्यांनी मिळून घेतल्याची जोरदार चर्चा आता सुरू आहे. सात पंच सदस्यांना त्या ८० लाख रुपयांतील प्रत्येकी एक लाख रुपये देण्यात आले. हा विषयदेखील या मतदारसंघात वादाचा बनला आहे. हॉटेलकडून पैसे कुणी घेतले, हे अनेकांना ठाऊक आहे, अशा प्रकारची चर्चा सुरू आहे. (खास प्रतिनिधी)