शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

नोकरभरतीच्या वादात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची सरशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2019 16:01 IST

नोकरभरतीवरून मुख्यमंत्री प्रमोद सावंत विरुद्ध आरोग्य मंत्री विश्वजित राणे असा सुप्त संघर्ष निर्माण झाला होता.

पणजी : क वर्गीय भरतीसाठी मुख्यमंत्रीप्रमोद सावंत यांनी राज्य कर्मचारी निवड आयोगाची स्थापना करताच आरोग्य खात्यातील नोकर भरतीला चाप लागला. यामुळे मुख्यमंत्री सावंत विरुद्ध आरोग्य मंत्री विश्वजित राणे असा सुप्त संघर्ष निर्माण झाला होता. प्रसारमाध्यमांमध्ये वाद गाजू लागला, पण तूर्त नोकर भरतीच्या वादात मुख्यमंत्र्यांचा विजय झाला आहे.मंत्री राणे यांना पत्रकारांनी शनिवारी नोकर भरतीविषयी विचारले तेव्हा ते म्हणाले की, मुख्यमंत्री सावंत यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. नोकर भरतीशी निगडीत जे काही वादाचे मुद्दे आहेत, त्यावर मुख्यमंत्रीच तोडगा काढतील. त्यासाठी आम्ही त्यांना थोडा वेळ द्यायला हवा. शेवटी इडकोसारखी तीन-चार खात्यांची समिती नोकर भरतीच्या प्रक्रियेसाठी विद्यमान मुख्यमंत्र्यांनी आणली नाही. ती समिती स्व. मनोहर पर्रीकर मुख्यमंत्रिपदी असताना स्थापन केली गेली होती. विद्यमान मुख्यमंत्र्यांना पूर्वीच्या प्रक्रिया आता पुढे न्याव्या लागत आहेत.मंत्री राणे म्हणाले, की मी नोकर भरतीच्या वादात कुठेच मुख्यमंत्र्यांविरुद्ध विधान केले नाही. आरोग्य खात्यासह सगळ्य़ाच खात्यांमध्ये वेगळा स्टाफिंग पॅटर्न आम्ही स्वीकारायला हवा. त्यात बदल व्हायला हवा. गोमेकॉमधील भरतीमुळे नजिकच्या भविष्यात गोमेकॉ  रुग्णालयाचा दर्जा खूप उंचावणार आहे. मुख्यमंत्री सगळ्य़ा विषयांतून योग्य तो मार्ग काढतील, असा मला विश्वास आहेच. शेवटी कोणत्याही मुख्यमंत्र्यांना राज्यावरील आर्थिक बोजा व परिणामांचाही विषय विचारात घ्यावा लागतो.सेझ जमिनीचा लिलावदरम्यान, आपली विविध विषयांवर मुख्यमंत्र्यांशी बोलणी झाली असल्याचे नमूद करून मंत्री राणे यांनी सेझच्या जमिनींचा उल्लेख केला. सेझ कंपन्यांकडून आम्ही जमीन परत घेताना पैसे फेडण्यासाठी कर्ज घेतले. आता ते कर्ज फेडण्यासाठी एकूण जमिनींपैकी पाच लाख चौरस मीटर क्षेत्रफळाची जमीन आम्ही लवकर लिलावात काढायला हवा. मी मुख्यमंत्र्यांशी याबाबत बोललो आहे, असे उद्योग मंत्री या नात्याने राणे यांनी सांगितले.

टॅग्स :Pramod Sawantप्रमोद सावंतgoaगोवाChief Ministerमुख्यमंत्री