विधवा महिलेचा भरदिवसा खून

By Admin | Updated: June 11, 2015 01:05 IST2015-06-11T01:04:34+5:302015-06-11T01:05:03+5:30

वास्को : बोगदा येथे राहाणाऱ्या रुक्मिणी पांडुरंग कानसे या ५५ वर्षीय विधवा महिलेचा अज्ञात व्यक्तीने डोक्यावर वार करून बुधवारी खून केला़ भरदिवसा झालेल्या

Bloodline of the widow woman | विधवा महिलेचा भरदिवसा खून

विधवा महिलेचा भरदिवसा खून

वास्को : बोगदा येथे राहाणाऱ्या रुक्मिणी पांडुरंग कानसे या ५५ वर्षीय विधवा महिलेचा अज्ञात व्यक्तीने डोक्यावर वार करून बुधवारी खून केला़ भरदिवसा झालेल्या या खुनाच्या घटनेमुळे बोगदा-जेटी भागात भीतीचे वातावरण पसरले आहे़
रुक्मिणी कानसे ही महिला बोगदा येथे आपला मुलगा सनील आणि पुतणी दीपाली कानसे यांच्यासह भाडेकरू म्हणून गेली काही वर्षे राहाते. बुधवारी सकाळी सनील आणि पुतणी दीपाली आपल्या कामानिमित्त बाहेर गेली होती़ रुक्मिणी घरात एकट्याच होत्या़ दुपारी सव्वाएक वाजण्याच्या सुमारास पुतणी दीपाली जेवणासाठी घरी आली असता, तिला घराला बाहेरून कडी लावल्याचे आढळले़ ती दार उघडून घरात गेली, त्या वेळी घरातील टी़व्ही़ मोठ्या आवाजात चालू होता़ काकी बाहेर न दिसल्याने ती आतल्या खोलीत गेली असता, रुक्मिणी या स्वयंपाकघरात रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे तिला दिसले़
हे दृश्य पाहून दीपाली किंचाळत घराबाहेर आली व शेजाऱ्यांना काकीचा खून झाल्याचे सांगितले. शेजाऱ्यांनी या घटनेची माहिती मुरगाव पोलिसांना दिली़ मुरगाव पोलीस स्थानकाचे निरीक्षक कपिल नाईक फ ौजफ ाटा घेऊन घटनास्थळी दाखल झाले़ त्यांनी खुनाचा तपास लावण्यासाठी श्वानपथक तसेच ठसेतज्ज्ञांना पाचारण केले़ पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा केला असता, रुक्मिणी यांच्या डोक्यावर मागून अवजड हत्याराने प्रहार केल्याचे दिसून आले़ (पान २ वर)

Web Title: Bloodline of the widow woman