शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
3
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
4
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
6
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
7
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
8
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
9
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
10
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
11
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
12
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
13
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
14
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
15
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
16
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
17
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
18
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
19
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
20
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
Daily Top 2Weekly Top 5

म्हादयीच्या बाबतीत दोन दिवसात कृती आराखडा जाहीर करा, अन्यथा राजीनामा द्या, विजय सरदेसाईंचे मुखमंत्र्यांना आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2020 22:30 IST

केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी गोव्यात आलेवेळी म्हादयी प्रश्नावर न बोलता या प्रश्नावर मुख्यमंत्री बोलतील असे म्हटले आहे. त्या पार्श्वभूमीवर सरदेसाई यांनी आता मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसात भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली.

मडगाव - केंद्राच्या दडपणाखाली गोव्यातील भाजप सरकारने म्हादयी विकल्याचा आरोप गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केला आहे. अन्यथा म्हादयी वाचवण्यासाठी आणि कर्नाटकात वळविण्यात आलेले पाणी पुन्हा गोव्यात आणण्यासाठी सरकारचा कृती आराखडा काय हे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दोन दिवसात जाहीर करावे असे आव्हान दिले आहे. नाहीतर मुख्यमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी गोव्यात आलेवेळी म्हादयी प्रश्नावर न बोलता या प्रश्नावर मुख्यमंत्री बोलतील असे म्हटले आहे. त्या पार्श्वभूमीवर सरदेसाई यांनी आता मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसात भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली.

जर म्हादयीबाबत सरकारकडे लपविण्यासारखे काही नव्हते तर केंद्रीय मंत्र्यांनी या प्रश्नावर बोलण्याचे का टाळले असा सवाल त्यांनी केला.ते म्हणाले , दोन दिवसात जर मुख्यमंत्री कृती आराखडा सादर करू शकत नाही. तर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि विधानसभाही बरखास्त करावी. या पुढील निवडणूक म्हादयी प्रश्नावर होऊ द्या. उगीच आम्ही लोकांबरोबर आहोत असे सांगून वेळ मारून नेऊ नका, केंद्र सरकार तुमचे ऐकत नसेल तर राजीनामा द्या आणि म्हादयीसाठी पुन्हा रिंगणात उतरा असे आव्हान त्यांनी सरकारला दिले. हे सरकार पाडण्याची वेळ येऊन ठेपली आहे. त्यासाठी सर्व गोवावादी शक्तींनी एकत्र येण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. गोवा वाचवायचा असेल तर याची नितांत गरज आहे असे ते म्हणाले.

म्हादयी पाणी तंटा लवादाने कर्नाटकाला पिण्यासाठी पाणी घेण्याची परवानगी देताना हे करण्यापूर्वी गोवा, कर्नाटक व महाराष्ट्र या तीन राज्यातील तज्ज्ञांची समिती नेमण्यास सांगितले होते. पण ही समिती नेमण्यापूर्वीच कर्नाटकाने पाणी वळवले आहे. राज्य सरकारचे अधिकारीही हे मान्य करतात. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. पण या महत्वाच्या प्रश्नावर गोवा सरकार मागचा एक महिना झोपून आहे आणि या सरकारचे मंत्री निलेश काब्राल मात्र या प्रश्नावर आम्ही लोकांबरोबर आहोत असे सांगत आहेत. हा दुटप्पीपणा का असा सवाल त्यांनी केला. मुख्यमंत्री म्हादयी आपल्याला आईसारखी असे म्हणतात पण प्रधानमंत्री मोदी यांना ते भेटले त्यावेळी ते या संबंधी एकही शब्द बोलत नाहीत, उलट त्यांचा सहभाग गोव्यातील बेकायदेशीर खनिज व्यवसायात असल्याने फक्त खनिज व्यवसाय गोव्यात कसा सुरू केला जाऊ शकतो यावर बोलून येत आहेत. यावरून काय समजावे असा सवाल त्यांनी केला.

सरदेसाई म्हणाले, जावडेकर यांनीच म्हादयीचे पाणी वळविण्याचा आदेश दिला. त्यांनीच मोले नष्ट करणाऱ्या प्रकल्पाना मंजुरी दिली. महामारीच्या स्थितीचा फायदा उठवून या सरकारने गोवा विकायला काढला असून गोवा सरकारचीही त्याला समंती आहे. ड्रोनच्या साहाय्याने जे चित्रीकरण करण्यात आले आहे त्यातून म्हादयीचे पाणी कर्नाटकने वळविले आहे हे स्पष्टपणे दिसते. यासाठीच यंदा विक्रमी पाऊस पडूनही म्हादयी केवळ ओढ्यासारखी वाहत आहे. दूधसागरही आटू लागला आहे असे स्थानिक लोक सांगतात. मात्र गोवा सरकार डोळे झाकून गप्प बसले आहे असा आरोप त्यांनी केला. या सरकारचे  पापाचे घडे भरले आहेत गोव्याची जनताच त्यांना धडा शिकवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला

टॅग्स :Pramod Sawantप्रमोद सावंतgoaगोवा