शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

राज्यभरात संतापाचा भडका; 'गोंयचो सायब'विषयी आक्षेपार्ह विधान, गौतम खट्टरविरुद्ध गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 07:48 IST

पोलिस पथकांकडून शोध सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी/वास्को : वास्को येथे शनिवारी झालेल्या कार्यक्रमात सनातन महासंघाचे संस्थापक गौतम खट्टर यांनी सेंट फ्रान्सिस झेव्हियर यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याने राज्यात सर्वत्र संतापाची लाट पसरली. त्यांच्या या विधानांचा सर्व स्तरातून निषेध करण्यात आला. काल, सोमवारी दिवसभरात राज्यभरात याचे तीव्र पडसाद उमटले. काँग्रेस, गोता फॉरवर्ड, आम आदमी पक्ष, आरजी या पक्षांसह सामाजिक कार्यकर्ते, ख्रिस्ती समुदायातील नागरिकांनी या विधानाचा तीव्र निषेध केला. खट्टर यांना अटक करून कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. वास्को, जुने गोवे, मडगाव, कोलवा यांसह सहा ठिकाणी खट्टरविरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या.

दरम्यान, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गौतम खट्टर यांनी सेंट फ्रान्सिस झेवियरसंबंधी केलेल्या गैरवक्तव्याबद्दल पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणी कडक कारवाई केली जाईल, असे जाहीर केले. तर पोलिस महासंचालक आलोक कुमार यांनी खट्टर याच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आल्याची माहिती दिली.

चर्च संस्थेनेही सेंट फ्रान्सिस झेव्हियर यांच्याबाबतच्या या वक्तव्याचा निषेध करत संबंधितांविरुद्ध तातडीने कायदेशीर कारवाईची मागणी केली. मडगाव येथे सकाळी शेकडो लोकांनी दक्षिण गोवा पोलिस अधीक्षकांकडे तक्रार दाखल करून खट्टर आणि आयोजक सनातन धर्म धर्म रक्षा समितीविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्याची आणि गौतम खट्टर यांना अटक करण्याची मागणी केली. यावेळी प्रतिमा कुतिन्हो यांच्यासह नागरिक उपस्थित होते. आम आदमी पक्षाचे गोवा प्रमुख वाल्मिकी नायक यांनीही तक्रार दिली आहे. गोवा फॉरवर्डचे नेते, आमदार विजय सरदेसाई, फादर एरेमिटो रेबेलो, माजी पर्यटन मंत्री मिकी पाशेको, चर्चिल आलेमाव आणि वालंका आलेमाव यांनीही पत्रकार परिषदा घेऊन टीकेची झोड उठवली.

दरम्यान, आमदार संकल्प आमोणकर, आंतोन वास यांसह अनेकांनी खट्टर यांच्या विधानांचा निषेध केला. हा समाजात फूट पाडण्याचा डाव असल्याचे कॅप्टन विरियातो फर्नाडिस यांनी म्हटले आहे. तर खट्टर यांनी जेव्हा गोंयच्या सायबांबाबत अपशब्द बोलण्यास सुरुवात केली, तेव्हा आम्ही त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. जे काही घडले ते चुकीचे आहे. यातून सर्वाच्या भावना दुखावल्या. याबद्दल सर्वांची माफी मागतो असे आमदार आमोणकर यांनी म्हटले आहे. तर माजी आमदार जुझे फिलिप डिसोझा यांनी खट्टरना अटक न झाल्यास टिळक मैदानावर विराट सभा घेऊ असा इशारा दिला.

आमदार एल्टन डिकोस्ता यांनी गौतम खट्टरनी मंत्री माविन गुदिन्हो यांच्या उपस्थितीत आक्षेपार्ह विधान केले. तरीदेखील मंत्र्यांनी त्यांना रोखले नाही. त्यामुळे ४८ तासांत गुदिन्होंना मंत्रिपदावरून हटवा, अशी मागणी केली. गौतम खट्टरना त्वरित अटक करावी, गोव्यातून हद्दपार करावे, अशी मागणी सांतआंद्रेचे आमदार वीरेश बोरकर यांनी केली. अशा लोकांना गोव्यात कुठलाही थारा दिला जाऊ नये. पोलिस महासंचालकांनी याची दखल घेऊन खट्टरविरोधात कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली.

...भाषण बंद करण्यास सांगितले, पण... : गुदिन्हो

'कार्यक्रमात प्रक्षोभक भाषणावेळी गौतम खट्टर यांना दोन वेळा थांबवण्याचा प्रयत्न केला होता. तशी चिठ्ठीही पाठवली होती. परंतु प्रेक्षकांनी भाषण सुरू ठेवण्यास सांगितल्याने त्यांनी बोलणे सुरू ठेवले. त्यांना जर तेव्हा भाषण बंद करण्यास सांगितले असते तर गोंधळ झाला असता. त्यामुळे ते सहन करावे लागले', असे वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी सांगितले.

मंत्री गुदिन्हो म्हणाले की, 'आम्ही काहीतरी चांगले ऐकायला मिळेल म्हणून भगवान परशुराम कार्यक्रमाला गेलो. मात्र आयोजकांनी कोणाचे भाषण असेल याची कल्पना दिली नव्हती. तेथे जे प्रक्षोभक भाषण झाले त्या घटनेचे मला दुःख असून त्याचा निषेध करतो. या घटनेमुळे गोमंतकीयांच्या भावना दुखावल्या आहेत.

गुदिन्हो म्हणाले की, 'येथील लोक सर्व धर्माचा आदर करतात. मात्र अशा वक्तव्यांमुळे या फूट पाडण्याचा प्रयत्न होतो. खट्टर यांचे भाषण दोन वेळा थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रेक्षकांनी त्याला बोलणे सुरूच ठेवण्यास सांगितले. जे घडले ते मलाही आवडले नाही. सरकार योग्य कारवाई करेल.

खट्टरविरुद्ध सहा तक्रारी : अधीक्षक कदम

गौतम खट्टरच्या विरोधात वास्को पोलिसांना रविवारी तक्रार मिळाली होती. तपासादरम्यान संशयित खट्टर गोव्यातून निघून गेल्याचे आढळून आले. या प्रकरणात गुन्हा नोंदविला आहे. खट्टरच्या शोधासाठी पोलिसांचे पथक दिल्लीला निघाले आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक गुरुदास कदम यांनी दिली. खट्टरविरोधात सहा तक्रारी असल्याचे त्यांनी सांगितले.

काँग्रेसने घेतली महासंचालकाची भेट

राज्यात धार्मिक भावना दुखावणारे, सामाजिक शांतता भंग करणारी वक्तव्ये सहन केली जाणार नाहीत, असा इशारा विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी दिला. काँग्रेस शिष्टमंडळाने पोलिस महासंचालक आलोक कुमार यांची भेट घेतली. दक्षिण गोवा खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस, आमदार एल्टन डिकॉस्टा, सुनील कवठणकर, अॅड. अमित पालेकर व अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. खट्टर यांना अटक करावी अशी मागणी काँग्रेसने पत्रकार परिषदेत केली. प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, खासदार फर्नांडिस, आमदार अॅड. कार्ल्स फेरेरा, मनिषा उसगावकर उपस्थित होते. आपचे गोवा प्रमुख वाल्मिकी नायक, गोवा फॉरवर्डचे नेते, आमदार विजय सरदेसाई, माजी पर्यटन मंत्री मिकी पाशेको, चर्चिल आलेमाव आणि वालंका आलेमाव यांनीही पत्रकार परिषदा घेऊन खट्टरच्या वक्तव्याचा निषेध केला.

पोलिस पथके रवाना : महासंचालक

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने पोलिस महासंचालक आलोक कुमार यांची पणजी येथील पोलिस मुख्यालयात जाऊन भेट घेतली. गौतम खट्टर यांना त्वरित अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली. महासंचालकांनी खट्टर यांच्या विरोधात कथित प्रक्षोभक भाषणाबाबत गुन्हा नोंद केला असून त्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले असल्याचे सांगितले. तर खट्टरच्या विरोधात एकूण सहा तक्रारी नोंदविण्यात आल्याची माहिती कदम यांनी दिली.

जाब विचारायला हवा होता : मुख्यमंत्री

दरम्यान, खट्टर यांनी वास्कोतील कार्यक्रमात हे वादग्रस्त वक्तव्य केले तेव्हा वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो व्यासपीठावर होते.परंतु त्यांनी काहीच आक्षेप घेतला नाही, याकडे पत्रकारांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, 'खरे म्हणजे माविन यांनी त्याच क्षणी खट्टर यांना जाब विचारायला हवा होता. परंतु हे सर्व अचानक घडल्याने माविन यांचीही द्विधा मनःस्थिती झाली असावी व त्यामुळेच ते काही बोलू शकले नसावेत. सरकारने खट्टर यांच्या वक्तव्याची गंभीर दखल घेतली असून तत्काळ गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणात योग्य ती कारवाई केली जाईल.'

'सनातन महासंघाचे संस्थापक गौतम खट्टर यांनी सेंट फ्रान्सिस झेवियरसंबंधी केलेल्या गैरवक्तव्याबद्दल पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणी कडक कारवाई केली जाईल. अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करणाऱ्यांनी गोव्याबाहेरून वक्ते आणल्यास त्यांना जातीय सलोखा बिघडेल, असे कोणतेही वक्तव्य त्यांनी करू नये, अशी समज द्यायला हवी. त्या वक्तव्याबद्दल रात्रीच पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.' - प्रमोद सावंत, मुख्यमंत्री 

English
हिंदी सारांश
Web Title : Outrage Over Saint Francis Xavier Remark; Case Filed Against Khattar

Web Summary : Gautam Khattar's remarks against Saint Francis Xavier sparked outrage in Goa. Protests erupted, demanding Khattar's arrest. Police filed a case and launched a search. Chief Minister Pramod Sawant promised strict action. Multiple complaints were registered against Khattar.
टॅग्स :goaगोवाPoliceपोलिसPoliticsराजकारण