शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

८ मतदान केंद्रे संवेदनशील

By admin | Updated: March 17, 2015 01:41 IST

पणजी : जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी जाहीर प्रचाराची रणधुमाळी सोमवारी सायंकाळी ५ वाजता संपली. बुधवारी दक्षिण आणि उत्तरेतील मिळून

पणजी : जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी जाहीर प्रचाराची रणधुमाळी सोमवारी सायंकाळी ५ वाजता संपली. बुधवारी दक्षिण आणि उत्तरेतील मिळून ५0 मतदारसंघांमध्ये ७ लाख ८0 हजार ५१७ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीची जय्यत तयारी केली असून उत्तरेत ७ व दक्षिणेत १ मिळून ८ मतदान केंद्रे संवेदनशील जाहीर करण्यात आली आहेत. राज्य निवडणूक आयुक्त डॉ. एम. मुदस्सीर यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, एकही केंद्र अतिसंवेदनशील नाही. मात्र, संवेदनशील केंद्रांमध्ये रेईश मागूश, चिंबल, ताळगाव, शेल्डे आदी मतदारसंघांतील केंद्रांचा समावेश आहे. उत्तर गोव्यात ३ लाख ८९ हजार ४५५, तर दक्षिण गोव्यात ३ लाख ९१ हजार ६८ मतदार आहेत. भाजप उत्तरेत २३ आणि दक्षिणेत ११ मिळून एकूण ३४ जागांवर, मगो उत्तरेत २ आणि दक्षिणेत ७ मिळून ९ जागांवर निवडणूक लढवीत आहे, तर दोन्ही जिल्ह्यांमध्ये १४९ अपक्ष रिंगणात आहेत. एकूण १९२ उमेदवार या निवडणुकीत आपले राजकीय भवितव्य अजमावत आहेत. मतदान बुधवार, १८ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत होईल. ५ वाजता रांगेत असलेल्यांना मतदान करता येईल. नंतर आलेल्यांना मतदान करता येणार नाही. मतमोजणी २0 रोजी होणार असून दोन्ही जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी २५ मतमोजणी केंद्रांची व्यवस्था केलेली आहे. मतदान मतपत्रिकांद्वारेच होणार असून मतपेट्या संबंधित केंद्रांवर मंगळवारी दुपारी २ वाजल्यापासून रवाना होतील. अशी आहे राखीवता... उत्तर गोव्यात १५, तर दक्षिण गोव्यात १४ मतदारसंघ राखीव आहेत. सर्वसाधारण वर्गातील महिलांसाठी ६ आणि ४ जागा राखीव आहेत. अनुसूचित जमातींसाठी अनुक्रमे १ व २, अनुसूचित महिलांसाठी अनुक्रमे १ व २, ओबीसी उमेदवारांसाठी अनुक्रमे ५ व ४, ओबीसी महिलांसाठी अनुक्रमे ३ व २ जागा राखीव आहेत. उत्तर गोव्यात ६२८ आणि दक्षिण गोव्यात ५८१ मिळून एकूण १२0९ मतदान केंद्रे आहेत. ४00 पेक्षा कमी मतदारसंख्या असलेली ७५ केंद्रे आहेत. ४00 ते ८00 मतदारसंख्या असलेली ९0७ केंद्रे, तर ८00 पेक्षा अधिक मतदारसंख्या असलेली २२७ मतदान केंद्रे आहेत. निवडणूकविषयक पाच किरकोळ तक्रारी आल्या असून जिल्हाधिकाऱ्यांच्या स्तरावर त्याबाबत चौकशी सुरू आहे. उत्तर गोव्यात ४, तर दक्षिण गोव्यात १ तक्रार आली आहे. गंभीर स्वरूपाच्या तक्रारी असल्या तरच त्या आपल्याकडे येतात, असे मुदस्सीर यांनी सांगितले. पत्रकार परिषदेस राज्य निवडणूक आयोगाचे सचिव डांगी, उत्तर गोव्याचे निवडणूक अधिकारी साबाजी शेटये आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)