जि.प. सदस्य तुलावींना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2020 06:00 AM2020-01-04T06:00:00+5:302020-01-04T06:00:18+5:30

शुक्रवारी जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक होती. या निवडणुकीसाठी प्रभाकर तुलावी हे येणार असल्याची कानकुन पोलिसांना लागली होती. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेने त्यांच्यावर नजर ठेवली होती. जिल्हा परिषदेत मतदानाची प्रक्रिया आटोपताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तुलावी यांना ताब्यात घेतले. सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक उल्हास भुसारी यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

ZP Member Tulavi arrested | जि.प. सदस्य तुलावींना अटक

जि.प. सदस्य तुलावींना अटक

Next
ठळक मुद्देअपहरण प्रकरण : मतदानासाठी आले होते गडचिरोलीत

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : विधानसभा निवडणुकीदरम्यान अपक्ष उमेदवार बग्गुजी ताडाम यांचे अपहरण केल्याच्या प्रकरणात कुरखेडा तालुक्यातील पलसगड-पुराडा जिल्हा परिषद क्षेत्राचे सदस्य प्रभाकर तुलावी यांना गडचिरोली जिल्हा परिषद येथून शुक्रवारी अटक करण्यात आली.
बग्गुजी ताडाम यांनी आरमोरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केल्यानंतर माजी आमदार आनंदराव गेडाम यांच्यासह ११ जणांवर गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी माजी आमदार आनंदराव गेडाम यांचा मुलगा लॉरेन्स गेडाम व अन्य सहा जण पोलिसांसमोर शरण आले. सध्या ते कारागृहात आहेत. मात्र या प्रकरणातील आनंदराव गेडाम, जीवन नाट यांच्यासह प्रभाकर तुलावी हे अन्य काही जण उच्च न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतरही फरार होते.
शुक्रवारी जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक होती. या निवडणुकीसाठी प्रभाकर तुलावी हे येणार असल्याची कानकुन पोलिसांना लागली होती. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेने त्यांच्यावर नजर ठेवली होती. जिल्हा परिषदेत मतदानाची प्रक्रिया आटोपताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तुलावी यांना ताब्यात घेतले. सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक उल्हास भुसारी यांच्या नेतृत्वात करण्यात आली. तुलावी यांच्या विरोधात आरमोरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल असल्याने तुलावी यांना आरमोरी पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले.
या प्रकरणात माजी आमदार आनंदराव गेडाम यांच्यासह माजी जि.प.उपाध्यक्ष जीवन नाट तथा इतर अनेक आरोपींना अद्याप अटक झालेली नाही. त्यापैकीच जि.प. सदस्य प्रभाकर तुलावी हेसुद्धा एक आहेत. इतर आरोपींनाही अटक करणार का, अशी कुजबूज सुरू होती.

आताच तुलावींचा पत्ता कसा काय मिळाला?
मागील तीन महिन्यांपासून तुलावी हे संपर्कक्षेत्राच्या बाहेर आहेत, असे पोलिसांकडून सांगण्यात येत होते. मात्र जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी तुलावी इतर सहकाऱ्यांसोबत जिल्हा परिषदेत बरोबर पोहोचले. पोलिसांना त्यांचा इतके दिवस थांगपत्ता लागत नसताना राजकीय पदाधिकाऱ्यांनाच ते कसे काय गवसले, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Web Title: ZP Member Tulavi arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.