शहरं
Join us  
Trending Stories
1
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
2
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
3
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

अंगावरून रेल्वे मालगाडी जाऊनही बचावला युवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 06:00 IST

गडचिरोली जिल्ह्यात देसाईगंज (वडसा) हे एकमेव रेल्वेस्थानक आहे. या ठिकाणी तीन प्लॅटफार्म आहेत. प्रत्येक प्लॅटफार्मवर जाण्यासाठी उडाणपूल बनविण्यात आले आहे. मात्र काही प्रवाशी उडाणपुलावरून न जाता शॉर्ट कट मारत खालूनच रेल्वे रूळ पार करून पुढे जातात. पण कधीकधी हा शॉर्ट कट जीवावर बेतू शकतो, याचा प्रत्यय वडसा स्थानकावरील सर्व प्रवाशांनी अनुभवला.

ठळक मुद्देवडसा स्थानकावरील थरार : रूळावर झोपल्याने वाचले प्राण

लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : रेल्वे मालगाडीच्या दोन डब्यांना जोडणाऱ्या रिकाम्या जागेतून दुसºया प्लॅटफार्मवर जाताना अचानक रेल्वे सुरू झाली अन् संपूर्ण मालगाडी त्याच्या अंगावरून पुढे निघून गेली. तरीही त्या युवकाला थोडी जखमही झाली नाही. हृदयाचे ठोके चुकविणारी ही घटना मंगळवारी (दि.१०) दुपारी वडसा रेल्वे स्थानकावर घडली.
गडचिरोली जिल्ह्यात देसाईगंज (वडसा) हे एकमेव रेल्वेस्थानक आहे. या ठिकाणी तीन प्लॅटफार्म आहेत. प्रत्येक प्लॅटफार्मवर जाण्यासाठी उडाणपूल बनविण्यात आले आहे. मात्र काही प्रवाशी उडाणपुलावरून न जाता शॉर्ट कट मारत खालूनच रेल्वे रूळ पार करून पुढे जातात. पण कधीकधी हा शॉर्ट कट जीवावर बेतू शकतो, याचा प्रत्यय वडसा स्थानकावरील सर्व प्रवाशांनी अनुभवला.
फलाट क्रमांक १ वर गोंदियाला जाणारी पॅसेंजर तर फलाट क्रमांक २ वर गोंदिया-बल्लारशहा डेमो उभी होती. तिसºया फलाटावर मालगाडी उभी होती. पॅसेंजर पकडण्यासाठी तीन युवकांनी मालगाडीच्या दोन डब्यांच्या मध्ये असलेल्या रिकाम्या जागेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला.
यामध्ये दोन तरूण रेल्वेडब्यांना जोडणाऱ्या जोडांवर उभे झाले. त्यामुळे तिसऱ्या युवकाने जॉर्इंटच्या खालच्या बाजुने जाऊन रूळ पार करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच वेळी मालगाडी सुरू झाल्याने दोन डब्यांच्या जोडावर उभे असलेल्या युवकांनी कसेतरी फलाटावर उड्या मारून स्वत:चे प्राण वाचविले, मात्र खालून जाणाऱ्या युवकापुढे कोणताच पर्याय शिल्लक नव्हता. यावेळी त्या युवकाने समयसूचकता दाखवत क्षणाचाही विलंब न करता दोन रूळांच्या मध्ये समांतर झोपला. यामुळे मालगाडीचे अनेक डबे त्याच्या अंगावरून धडधडत पुढे निघून गेले. मात्र त्या युवकाला कोणतीही इजा झाली नाही.
मालगाडी निघून गेल्यानंतर भयभीत झालेल्या युवकाने रेल्वे स्थानकावरून पळ काढला. त्यामुळे त्याचे नाव कळू शकले नाही. हा चित्तथरारक प्रसंग काही रेल्वेप्रवाशांनी मोबाईलच्या कॅमेºयात कैद केला.

उड्डाणपुलाचा वापर करा
फलाट ओलांडण्यासाठी रेल्वेने उड्डाण पूल बनविले आहेत. मात्र अनेक वेळा प्रवाशी त्याचा वापर न करता खालूनच रेल्वे रुळावरून पलिकडे जातात. परिणामी अशा जीवघेण्या प्रसंगांना सामोरे जावे लागते. रेल्वे रूळ ओलांडणे बेकायदेशीर आहे. प्रवाशांनी उड्डाण पुलावरूनच फलाट ओलांडावा, असे आवाहन देसाईगंजचे स्टेशनमास्टर संजयकुमार सिंग यांनी ‘लोकमत’च्या माध्यमातून रेल्वे प्रवाशांना केले आहे.

टॅग्स :railwayरेल्वे