बोहल्यावर चढण्यापूर्वीच युवकाने संपविली जीवनयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 06:00 IST2020-02-29T06:00:00+5:302020-02-29T06:00:35+5:30

प्रविण दिवटे (२५) रा. वैरागड असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. प्रविण दिवटे या युवकाचे लग्न जुळले होते. साक्षगंधाचा कार्यक्रम पार पडून २५ मार्च ही लग्नाची तारीखही निश्चित झाली. नवरदेव मुलगा लग्नाच्या तयारीसाठी लागला. वरात नेण्यासाठी वाहनांची बुकींग करण्यात आली. दरम्यान शुक्रवारी प्रविण याने आपल्या घरी थिमेट खाऊन आत्महत्या केली. मृतक प्रविणच्या वडिलाचे वैरागड येथे टेलरिंगचे दुकान आहे.

The young man ended his life journey before boarding | बोहल्यावर चढण्यापूर्वीच युवकाने संपविली जीवनयात्रा

बोहल्यावर चढण्यापूर्वीच युवकाने संपविली जीवनयात्रा

ठळक मुद्देवैरागडातील घटना : आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : लग्न जुळले, साक्षगंध झाले. लग्नाची तारीखही निश्चित झाली. लग्नकार्याच्या तयारीसाठी उपवर मुलगा लागला. मात्र लग्नाच्या बोहल्यावर चढण्यापूर्वीच उपवर युवकाने आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना २८ फेब्रुवारी शुक्रवारला सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास वैरागड येथे घडली.
प्रविण दिवटे (२५) रा. वैरागड असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. प्रविण दिवटे या युवकाचे लग्न जुळले होते. साक्षगंधाचा कार्यक्रम पार पडून २५ मार्च ही लग्नाची तारीखही निश्चित झाली. नवरदेव मुलगा लग्नाच्या तयारीसाठी लागला. वरात नेण्यासाठी वाहनांची बुकींग करण्यात आली. दरम्यान शुक्रवारी प्रविण याने आपल्या घरी थिमेट खाऊन आत्महत्या केली. मृतक प्रविणच्या वडिलाचे वैरागड येथे टेलरिंगचे दुकान आहे. प्रविण हा आपल्या वडिलाच्या व्यवसायात मदत करायचा. मनमिळावू व साध्या स्वभावामुळे प्रविण हा गावात लोकप्रिय होता. मात्र अचानक त्याने आत्महत्या केल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रविणच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. घरात लग्नकार्य म्हटले की, आबालवृध्दांसह साऱ्याच मनात उत्साह राहतो. घरी आनंदाची पर्वणी असते. मात्र प्रविणच्या आत्महत्येने वातावरण बदलले.

Web Title: The young man ended his life journey before boarding

टॅग्स :Deathमृत्यू