पेपरमिल-कुनघाडा (माल) रस्त्यावर गिट्टी टाकून काम केले बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:33 IST2021-04-19T04:33:54+5:302021-04-19T04:33:54+5:30

चामाेर्शी तालुक्यातील प्रशांतधाम चपराळा येथे महाशिवरात्रीला यात्रा भरत असल्याचे कारण समाेर करून फेब्रुवारी महिन्यातच रस्त्याच्या कामाला सुरूवात झाली. काही ...

Work done by throwing ballast on Papermill-Kunghada (goods) road | पेपरमिल-कुनघाडा (माल) रस्त्यावर गिट्टी टाकून काम केले बंद

पेपरमिल-कुनघाडा (माल) रस्त्यावर गिट्टी टाकून काम केले बंद

चामाेर्शी तालुक्यातील प्रशांतधाम चपराळा येथे महाशिवरात्रीला यात्रा भरत असल्याचे कारण समाेर करून फेब्रुवारी महिन्यातच रस्त्याच्या कामाला सुरूवात झाली. काही दूर अंतरापर्यंत काम पूर्ण केले. मात्र, ६ किमी अंतरापर्यंत गिट्टी पसरवून ठेवली. त्यामुळे नागरिकांना या गिट्टीवरून वाहने चालवावी लागत आहेत. याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. सध्या काम बंद पडलेले आहे. दीड महिन्यानंतर पावसाळ्याला सुरुवात हाेईल. तेव्हा काम करणे शक्य नाही. त्यामुळे सहा किमी अंतराचे काम लवकर पूर्ण करावे,अशी मागणी इल्लूरचे सरपंच तुळशीराम मडावी, उपसरपंच रामचंद्र बामणकर, सदस्य बुवाबा मडावी, सुरेखा वनकर, संतोष मडावी, ठाकरीच्या सरपंच नंदा कुळसंगे, उपसरपंच मधुकर दुमनवार, सदस्य सीताराम कुळसंगे, नीलकंठ कुकुडकर, कुनघाडाच्या सरपंच माया कन्नाके, उपसरपंच पौर्णिमा बोलगोडवार, अरविंद कन्नाके, योगेश पेंदाम, प्रकाश वासेकर, पुष्पा कन्नाके यांनी केली आहे.

===Photopath===

180421\18gad_4_18042021_30.jpg

===Caption===

पेपरमिल ते कुनघाडा मार्गावर  अशाप्रकारे केवळ गिट्टी टाकली आहे.

Web Title: Work done by throwing ballast on Papermill-Kunghada (goods) road