कोनसरी येथे महिलांचा मेळावा

By Admin | Updated: July 10, 2015 02:07 IST2015-07-10T02:07:39+5:302015-07-10T02:07:39+5:30

तालुक्यातील कोनसरी येथे अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांचा मेळावा घेण्यात आला.

Women's Convention at Kosari | कोनसरी येथे महिलांचा मेळावा

कोनसरी येथे महिलांचा मेळावा

चामोर्शी : तालुक्यातील कोनसरी येथे अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांचा मेळावा घेण्यात आला. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी १३ जुलै रोजी जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी फकिरा ठेंगणे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून संघटनेचे अध्यक्ष प्रा. रमेशचंद्र दहिवडे, बाबाराव मून उपस्थित होते. मागणी न करतांनाही शासनामार्फत अंगणवाड्यांना अनावश्यक वस्तुंचा पुरवठा केला जात आहे. यातून करोडो रूपयांचे कमिशन अनेकजण लाटतात. १५ रूपयांत उपलब्ध होणारा चित्रकोंडी संच १२७ रूपयाला खरेदी करण्याचे प्रकारही घडला आहे, असे रोखठोक मत अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले. प्रास्ताविक कौशल्या गौरकार यांनी केले. आभार सुशीला पालोजवार यांनी मानले. कपीला गोंगले, निवृत्ता उंदीरवाडे, सुमित्रा देवतळे, शांता चिताळे, नेवारे यांनी सहकार्य केले.(शहर प्रतिनिधी)

Web Title: Women's Convention at Kosari