शहरं
Join us  
Trending Stories
1
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
3
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
4
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
5
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
6
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
7
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
8
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
9
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
10
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
11
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
12
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
13
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
14
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
15
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
16
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
17
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
18
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
19
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
20
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

वन्य प्राणी व पक्ष्यांची पाण्यासाठी गावाकडे धाव

By admin | Updated: April 2, 2016 01:46 IST

देसाईगंज तालुक्यातील विसोरापासून तीन किमी अंतरावर शंकरपूर उपवनक्षेत्राला प्रारंभ होतो. यंदाच्या खरीप हंगामात अत्यल्प पाऊस झाल्याने ...

तलाव, बोड्या कोरडे : शिकारीचा धोका वाढला; वन विभागाचे नियोजन शून्यविसोरा : देसाईगंज तालुक्यातील विसोरापासून तीन किमी अंतरावर शंकरपूर उपवनक्षेत्राला प्रारंभ होतो. यंदाच्या खरीप हंगामात अत्यल्प पाऊस झाल्याने जंगलातील पाणीसाठे पूर्णत: कोरडे पडले आहेत. याशिवाय नदी, नाले, तलाव, बोड्या कोरड्या ठणठणाट आहेत. उष्णतामान वाढत असल्यामुळे जंगलातील वन्यप्राणी व पक्षी पाण्यासाठी गावाकडे धाव घेत आहेत. पाणझळीमुळे जंगल निष्पर्ण झाले आहे. परिणामी जंगलातील अस्वल, नीलगाय, हरीण, ससा, कोल्हा, डुकर, तडस, बिबट, मोर आदी प्राणी तसेच पांजरा, तीतीर, साळुंकी आदींसह अन्य पक्षी पाण्यासाठी गावाकडे धाव घेत आहेत. विसोरा, शुकरपूर, डोंगरमेंढा, कसारी, पिंपळगाव परिसरातील लोकवस्तीनजीकच्या पाणवठ्यावर हे वन्यप्राणी व पक्षी आगेकुच करीत असल्याचे दिसून येत आहे. मार्च महिना संपला असून एप्रिल महिन्याला सुरुवात झाली आहे. उष्णतामानही प्रचंड वाढल्यामुळे जंगलातील जलसाठे वेगाने कोरडे पडले आहेत. पाणी शिल्लक असलेल्या तलाव, बोडी व नदीकडे स्वत:ची तृष्णा भागविण्यासाठी वन्यप्राणी व पक्षी धाव घेत आहेत. पक्षी, प्राण्यांचे बेहाल थांबविण्यासाठी वन विभागान योग्य नियोजन करून जंगली भागात पाण्याची सुविधा करावी तसेच वन्यजीवांसाठी मोबाईल पाणी टँकची सुविधा करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. (वार्ताहर)