उमेदवारांच्या जय-पराजयाचे श्रेय आणि जबाबदारी कुणाची?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2019 06:00 AM2019-10-27T06:00:00+5:302019-10-27T06:00:29+5:30

अहेरीतून पुन्हा अम्ब्रिशराव यांना उमेदवारी देण्यावरून भाजपमध्ये धुसफूस होती. त्यातूनच संघाच्या गोटातून दुसरेचे नाव चालविण्यात आले. पण वरिष्ठांनी अम्ब्रिशराव यांचे नाव जाहीर झाल्यानंतर भाजपने सर्व फळी त्यांच्या बाजुने उभी केली. असे असली तरी अम्ब्रिशराव यांची राजगादीच त्यांच्या प्रतिमेत अडसर ठरली. त्यांनी ‘महाराज’ म्हणून नाही तर ‘लोकप्रतिनिधी’ म्हणून आमच्याशी वागावे ही अपेक्षा ते पूर्ण करू शकले नाही. त्याचा फटका त्यांना मतांच्या रूपात बसला.

Who has the credit and responsibility for the victory of the candidates? | उमेदवारांच्या जय-पराजयाचे श्रेय आणि जबाबदारी कुणाची?

उमेदवारांच्या जय-पराजयाचे श्रेय आणि जबाबदारी कुणाची?

Next
ठळक मुद्देसंडे अँकर । उमेदवारांच्या प्रतिमेसह नेत्यांच्या मेहनतीने यश

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : २०१४ च्या निवडणुकीत गडचिरोली, आरमोरी आणि अहेरी या तीनही मतदार संघात भाजपने नव्या दमाच्या उमेदवारांना रिंगणात उतरविले होते. भाजपच्या लाटेत त्यावेळी प्रथमच तीनही मतदार संघात या उमेदवारांनी बाजी मारली. पण यावेळी त्या उमेदवारांचा कस लागणे स्वाभाविक होते. उमेदवारांची वैयक्तिक कामगिरी आणि मतदारांमध्ये असलेली प्रतिमा, भाजपच्या कार्यकर्त्यांचे बुथस्तरापर्यंतचे नेटवर्क, विविध उपक्रमातून केलेली पक्ष बांधणी आणि सत्ताधारी असल्यामुळे सरकारची प्रतिमा, अशा सर्वच बाजुने भक्कम असणे जिंकण्यासाठी आवश्यक होते. मात्र अहेरीत काही कमकुवत बाजूंमुळे निवडणूक जिंकण्याचे गणित बिघडले.
अहेरीतून पुन्हा अम्ब्रिशराव यांना उमेदवारी देण्यावरून भाजपमध्ये धुसफूस होती. त्यातूनच संघाच्या गोटातून दुसरेचे नाव चालविण्यात आले. पण वरिष्ठांनी अम्ब्रिशराव यांचे नाव जाहीर झाल्यानंतर भाजपने सर्व फळी त्यांच्या बाजुने उभी केली. असे असली तरी अम्ब्रिशराव यांची राजगादीच त्यांच्या प्रतिमेत अडसर ठरली. त्यांनी ‘महाराज’ म्हणून नाही तर ‘लोकप्रतिनिधी’ म्हणून आमच्याशी वागावे ही अपेक्षा ते पूर्ण करू शकले नाही. त्याचा फटका त्यांना मतांच्या रूपात बसला.
गडचिरोली आणि अहेरीत भाजपच्या विजयात प्रतिस्पर्धी काँग्रेस उमेदवारांचा कमकुवतपणाही काही अंशी कामी आला. गडचिरोलीत भाजपच्या शिस्तबद्ध यंत्रणेपुढे काँग्रेसच्या नवख्या उमेदवार टिकाव धरू शकल्या नाही. जिल्हाध्यक्ष म्हणून किशन नागदेवे यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर तीनही उमेदवारांसाठी त्यांनी भाजपची फळी कामी लावली. अहेरीत बाजू कमकुवत असल्याचे लक्षात आल्यानंतर कमीत कमी वेळेत अमित शहांच्या सभेचे नियोजन केले. त्याचा फायदाही झाला, पण तो विजयात रुपांतरित होऊ शकला नाही.
आरमोरीत वरकरणी निवडणूक सोपी वाटत असली तरी पुन्हा कौल मिळणे एवढे सोपे नव्हते. या मतदार संघाच्या सभोवती असलेल्या आमगाव, अर्जुनी मोरगाव, साकोली आणि ब्रह्मपुरी या चारही मतदार संघात भाजपला यश मिळाले नाही. अशा वातावरणात आरमोरीची जागा टिकवणे कठीण होते. मात्र भाजपच्या फळीसह सहकार नेते अरविंद सा.पोरेड्डीवार यांचे मार्गदर्शन, प्रकाश पोरेड्डीवार यांनी किंगमेकरच्या भूमिकेत ठेवलेली पकड या जमेच्या बाजू ठरल्या. त्यामुळे गजबे यांचे मताधिक्य गेल्या निवडणुकीच्या तुलनेत ९ हजारांनी वाढले.
पूर्व विदर्भातील सर्वच जिल्ह्यात भाजपला अनपेक्षित फटका बसला. शेवटच्या टोकावरचा गडचिरोली जिल्हाही त्यासाठी अपवाद नाही. मात्र लगतच्या भागात भाजपने जागा गमावल्या असताना गडचिरोली आणि आरमोरी मतदार संघाने पुन्हा एकदा भाजपच्या उमेदवारांना कौल दिला. त्या उमेदवारांच्या विजयाचे श्रेय कुणाचे आणि अहेरी मतदार संघातील पराजयाची जबाबदारी कुणाची, यावर आता काथ्याकूट सुरू आहे.

Web Title: Who has the credit and responsibility for the victory of the candidates?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.