चामोर्शीच्या दोन वार्डांचा पाणीपुरवठा विस्कळीत

By Admin | Updated: May 29, 2015 01:09 IST2015-05-29T01:09:31+5:302015-05-29T01:09:31+5:30

चामोर्शी शहरातील बायपास तहसील कार्यालय मार्गावर असलेल्या जुन्या पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीचे निर्लेखन करण्याचे काम सुरू आहे.

Water supply of two wards of Chamorshi disrupted | चामोर्शीच्या दोन वार्डांचा पाणीपुरवठा विस्कळीत

चामोर्शीच्या दोन वार्डांचा पाणीपुरवठा विस्कळीत

दोन दिवस झाले : टाकी पाडताना मुख्य पाईपलाईन फुटली
चामोर्शी : चामोर्शी शहरातील बायपास तहसील कार्यालय मार्गावर असलेल्या जुन्या पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीचे निर्लेखन करण्याचे काम सुरू आहे. त्याच टाकीच्या बाजुला दुसरी पाणीसाठवण करणारी टाकी आहे.
जुन्या टाकीचे निर्लेखन काम सुरू असल्याने सिमेंटच्या दगडांचा मोठा ढीग पडल्याने मुख्य पाईपलाईन फुटली. त्यामुळे दोन दिवसांपासून हनुमाननगर, चांभारपुरा, गोंडपुरा या तीन वार्डांचा पाणीपुरवठा दोन दिवसांपासून बंद आहे. उन्हाळ्याच्या दिवसात पाणी समस्या निर्माण झाल्याने नागरिकांना पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पाईपलाईन दुरूस्त करून तत्काळ पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी माजी ग्रा. पं. सदस्य सुमेध तुरे व नागरिकांनी केली आहे.

Web Title: Water supply of two wards of Chamorshi disrupted