सिंघनपेठात पाण्यासाठी भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2020 05:00 AM2020-10-02T05:00:00+5:302020-10-02T05:00:19+5:30

सिंघनपेठ गावात १५० च्या वर घरे असून गावाची लोकसंख्या ७०० च्या जवळपास आहे. गावात काही विहिरी आहेत. तर ६ हातपंप आहेत. यापैकी होमराज करमे, शंकर येल्लुरकर, रवी कोडापे यांच्या घराजवळील तसेच जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणावरील चार हातपंप बंद आहेत. त्यामुळे संपूर्ण गावाच्या पाण्याची मदार दोेन हातपंप व विहिरींवर अवलंबून आहे. विहिरीचे पाणी बकेटने काढावे लागते.

Wandering for water in Singhanpeth | सिंघनपेठात पाण्यासाठी भटकंती

सिंघनपेठात पाण्यासाठी भटकंती

googlenewsNext
ठळक मुद्देसहापैकी चार हातपंप महिनाभरापासून बंद : दुरूस्तीकडे विभागाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : तालुका मुख्यालयापासून २० किमी अंतरावर असलेल्या कोठारी ग्रामपंचायतमधील सिंगनपेठ गावातील ६ पैकी ४ हातपंप मागील एक महिन्यापासून बंद आहेत. त्यामुळे ऐन पावसाळ्यात येथील महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
सिंघनपेठ गावात १५० च्या वर घरे असून गावाची लोकसंख्या ७०० च्या जवळपास आहे. गावात काही विहिरी आहेत. तर ६ हातपंप आहेत. यापैकी होमराज करमे, शंकर येल्लुरकर, रवी कोडापे यांच्या घराजवळील तसेच जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणावरील चार हातपंप बंद आहेत. त्यामुळे संपूर्ण गावाच्या पाण्याची मदार दोेन हातपंप व विहिरींवर अवलंबून आहे. विहिरीचे पाणी बकेटने काढावे लागते. त्यामुळे बऱ्याचशा महिला विहिरीचे पाणी न भरता हातपंपाचे पाणी भरतात. जे हातपंप सुरू आहेत त्या हातपंपातूनही अतिशय कमी प्रमाणात पाणी निघते. या दोन्ही हातपंपाचे पाणी जेमतेम १० घरांना पुरू शकते. अशा स्थितीत संपूर्ण गावाचा भार या दोन हातपंपांना सांभाळावा लागत आहे. त्यामुळे दोन्ही हातपंपांवर महिलांची गर्दी दिसून येत आहे. आपल्या वॉर्डातील हातपंप बंद असल्याने दुसºया वॉर्डात जाऊन पाणी आणावे लागत आहे. ऐन पावसाळ्यात सिंगनपेठ येथील महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने दिसून येत आहे.
भाजपचे जिल्हा सचिव तथा आदिवासी आघाडीचे महाराष्टÑ प्रदेश सदस्य संदीप कोरेत यांनी अहेरीचे संवर्ग विकास अधिकारी यांची भेट घेऊन निवेदन दिले. गावातील पाणीटंचाईची समस्या त्यांच्या लक्षात आणून दिली. हातपंप दुरूस्त न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.


दिवसभर शेतीचे काम, सायंकाळी पाण्यासाठी वनवन
दिवसभर शेतीची कामे केल्यानंतर सायंकाळी पुन्हा पाण्यासाठी वनवन करावी लागत आहे. यामुळे येथील महिला त्रस्त झाल्या आहेत. गावातील बहुतांश नागरिकांकडे जनावरे आहेत. या जनावरांसाठीही पाणी लागत असल्याने अधिकचे पाणी भरावे लागत आहे. त्यातच गावातील हातपंप बंद आहेत. पंचायत समितीने याकडे लक्ष घालून हातपंप दुरूस्त करून द्यावे, अशी मागणी होत आहे.

Web Title: Wandering for water in Singhanpeth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.