शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
4
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
5
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
6
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
7
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
8
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
9
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
10
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
11
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
12
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
13
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
14
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
15
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

बांडिया नदीवर पुलाची प्रतीक्षा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 06:00 IST

दिवाळीपासून उन्हाळ्यापर्यंत नदीतून ये-जा करणे शक्य होते. परंतु पावसाळ्यात नदीतून पाणी वाहत असल्याने आवागमन करता येत नाही. तालुक्यातील कुदरी, मोहुर्ली, हेटलकसा, वेलमगल, पिपली, बुर्गी, जिजावंडी, इरपनारसह अन्य दोन गावातील नागरिकांना ये-जा करताना अडचणी येतात. या गावातील नागरिकांना बांडिया नदी ओलांडून विविध कामांकरिता तालुका मुख्यालयात यावे लागते.

ठळक मुद्दे१० गावांच्या आवागमनाचा प्रश्न : दळणवळणास अडचणी; नागरिकांना होतो त्रास

लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम व नक्षलग्रस्त तालुका म्हणून एटापल्लीची ओळख आहे. या तालुक्यात मूलभूत सोयीसुविधा अद्यापही पोहोचल्या नाही. नागरिक वीज, पाणी, रस्ते, पूल आदींपासून वंचित आहेत. तालुक्यातील बांडिया नदीवर अनेक वर्षांपासून अद्यापही पुलाचे बांधकाम न झाल्याने पावसाळ्यात नागरिकांना ये-जा करता येत नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांना प्रचंड त्रास होतो.बांडिया नदी परिसरात दोन्ही बाजूला दहा पेक्षा अधिक गावे आहेत. या गावातील नागरिकांना दोन्ही बाजूला ये-जा करावी लागते. दिवाळीपासून उन्हाळ्यापर्यंत नदीतून ये-जा करणे शक्य होते. परंतु पावसाळ्यात नदीतून पाणी वाहत असल्याने आवागमन करता येत नाही. तालुक्यातील कुदरी, मोहुर्ली, हेटलकसा, वेलमगल, पिपली, बुर्गी, जिजावंडी, इरपनारसह अन्य दोन गावातील नागरिकांना ये-जा करताना अडचणी येतात. या गावातील नागरिकांना बांडिया नदी ओलांडून विविध कामांकरिता तालुका मुख्यालयात यावे लागते. मागील अनेक वर्षांपासून बांडिया नदीवर पुलाचे बांधकाम करण्याची मागणी केली जात आहे. परंतु या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे.पावसाळ्यात नागरिकांना तीन महिने पुरेल ऐवढ्या दैनंदिन गरजेच्या वस्तू पावसाळ्यापूर्वीच खरेदी करून न्याव्या लागतात. विशेष म्हणजे, पावसाळ्यात पुरांमुळे या परिसरातील विद्यार्थी एटापल्ली येथे शिक्षण घेण्यासाठी जाऊ शकत नाही. त्याबरोबरच रूग्णांची प्रकृती बिघडल्यास त्यांना एटापल्ली येथे उपचारासाठी आणता येत नाही. गरजेच्या वस्तूंची व्यवस्था आधीच करून ठेवावी लागते. त्यामुळे या नदीवर पुलाचे बांधकाम करावे, अशी मागणी होत आहे.पुलामुळे संपर्कास वावएटापल्ली तालुक्याला छत्तीसगड राज्याची सीमा लागून आहे. त्यामुळे दुर्गम भागातील अनेक नागरिक छत्तीसगड येथे विविध वस्तू खरेदी-विक्रीचा व्यवहार करतात. बांडिया नदीवर पुलाचे बांधकाम झाल्यास छत्तीसगड राज्यात पुन्हा व्यवसाय वाढू शकते. तसेच दोन्ही राज्यातील नागरिकांसाठी सोयीचे होऊ शकते. त्यामुळे या ठिकाणी नवीन उंच पुलाचे बांधकाम करण्याची गरज आहे.

टॅग्स :riverनदी