शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

गावकऱ्यांनी केला दारूमुक्तीचा संकल्प

By admin | Updated: June 29, 2015 01:55 IST

गडचिरोली जिल्ह्यात कायद्याने दारूबंदी असूनही अहेरी तालुक्याच्या कमलापूर भागात अवैध दारूविक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

कोडसेलगुड्डम येथे बैठक : दारूबंदी समितीची स्थापना, दारू विक्रेत्यांवर होणार कारवाईकमलापूर : गडचिरोली जिल्ह्यात कायद्याने दारूबंदी असूनही अहेरी तालुक्याच्या कमलापूर भागात अवैध दारूविक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यामुळे गावातील सामाजिक वातावरण बिघडत आहे. गाव व कुटुंबाच्या विकासासाठी दारूमुक्त समाजाची गरज ओळखून कोडसेलगुड्डमवासीयांनी दारूमुक्तीचा संकल्प केला आहे. या संदर्भात रविवारी कमलापूर ग्रामपंचायतीचे सरपंच सांबय्या मोंडी करपेत यांच्या अध्यक्षतेखाली गावात मुख्य चौकात बैठक घेण्यात आली. या बैठकीत कोडसेलगुड्डम गावातील ग्रामपंचायत पदाधिकारी सर्व गावकऱ्यांच्या सहमतीने दारूमुक्तीचा निर्णय घेण्यात आला. बाहेरगावावरून दारू आणून गावात विकणाऱ्यांवर १२ हजार रूपये, गावात मोहफुलाची दारू काढून विकणाऱ्यावर १० हजार रूपये व दारू प्राशन करून घरी व गावात भांडण करणाऱ्यांवर सहा हजार रूपये तसेच मद्यपींवर तीन हजार रूपये दंड आकारण्यात येईल, असे या बैठकीत ठरविण्यात आले. यावेळी ग्रा.पं. सदस्य संतोष सिडाम, मलय्या साकडी, राजम मडावी यांच्यासह बचत गटांच्या महिला व नागरिक उपस्थित होते. कमलापूर, ताटीगुड्डम, छल्लेवाडा या गावात दारूमुक्तीचा निर्णय घेण्यात येणार आहे. (वार्ताहर)