शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

शेतीसाठी ट्रॅक्टर पोसणारे विसोरा गाव

By admin | Updated: April 5, 2017 01:34 IST

शेती व्यवसायाला पारंपरिकतेची जोड देऊन बैैलबंडी, बैैलजोडीच्या साह्याने ऐरवी शेती केली जाते. हे सर्वत्र परिचित आहे.

गावात १२७ ट्रॅक्टर : १९५६ ला पोहोचले पहिले ट्रॅक्टर अतुल बुराडे   देसाईगंज शेती व्यवसायाला पारंपरिकतेची जोड देऊन बैैलबंडी, बैैलजोडीच्या साह्याने ऐरवी शेती केली जाते. हे सर्वत्र परिचित आहे. परंतु एखाद्या गावात बैैलजोडीपेक्षा यंत्राचा वापर शेती कसण्यासाठी अधिक होत असेल तर नवलच. परंतु ही नवलाई घडविली आहे गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यातील विसोरा गावाने. ४ हजार ६०४ लोकसंख्या असलेल्या या गावात सध्या तब्बल १२७ ट्रॅक्टर आहेत. बैलजोडीप्रमाणे ट्रॅक्टर पोसून येथील शेतकरी पारंपरिकतेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन शेती व्यवसाय करीत आहेत. मागास समजल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात एका छोट्याशा गावात १९५६ ला पहिले ट्रॅक्टर पोहोचणे म्हणजे नवलच होय. जिल्ह्यातील औद्योगिक शहर म्हणून ओळख असलेल्या देसाईगंजपासून सहा किमी अंतरावर विसोरा हे छोटेशे गाव. या गावातील शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेती करीत होते. परंतु पारंपरिक शेतीला यांत्रिकतेची जोड मिळावी या हेतूने शेतकरी वासुदेव नाकाडे यांनी १९५६ मध्ये केवळ ७ हजार रूपयांत गावात जर्मन कंपनीचा बुलडॉग लाँज नावाचा पहिला ट्रॅक्टर आणला. त्यानंतर गावातील शेतीत तंत्रज्ञानाचा वापर वाढण्याची जणूकाही होडच लागली. दरवर्षी शेतकरी नवनवीन कंपनीच्या ट्रॅक्टर आणू लागले. १९६० पासून गावात नवीन ट्रॅक्टर आणण्याची रिघ लागली. ती आजतागायत सुरू आहे. गावात आजघडीला तब्बल १२७ ट्रॅक्टर असून शेतकरी शेती व्यवसाय तंत्रज्ञानासह करीत आहेत. १९५० च्या दशकात ट्रॅक्टर म्हणजे काय, हे ऐकायलाच नवलाचेच होते. परंतु या काळात विसोरासारख्या छोट्या गावात १९५६ ला ट्रॅक्टर आल्याने ट्रॅक्टर बघण्यासाठी पंचक्रोशितील लोक गोळा व्हायचे. ट्रॅक्टरच्या मागे धावायचे. साधी सायकल सुद्धा या काळात नवलाची होती. त्यात तर ट्रॅक्टरसारखे मोठे यंत्र म्हणजे नवलाचेच होते. त्यानंतर दुसऱ्याच वर्षी म्हणजे १९५७ साली रामचंद्र नाकाडे, रेशीम नाकाडे या दोघांनी रशियन ट्रॅक्टर घेतला. वासुदेव पाटील नाकाडे यांनीच १९६०-६२ च्या दरम्यान जॉन डियर लाँज टॅ्रक्टर विकत घेतला. कमी हॉर्स पॉंवरमुळे त्याचे ‘बोदबोद्या’ हे नाव पडले. त्यामुळे हे ट्रॅक्टर सर्वात जास्त काळ लक्षात राहिले. १९६५ साली झेटर तर १८ मार्च १९७५ या दिवशी आयशर टॅ्रक्टर आत्माराम नाकाडे यांनी खरेदी केले. ६० च्या दशकात दळणवळणाच्या सुविधाच नसल्याने बाल गोपालांसह वयस्कांनाही वाहनांबद्दल एक वेगळेच आकर्षण होते. रस्त्यावरून ट्रॅक्टर धावू लागताच नागरिकांची ट्रॅक्टर पाहण्यासाठी गर्दी उसळायची. अनेक जणांकडे तीन ते चार ट्रॅक्टर विसोरा गावात १ हजार १२४ कुटुंब आहेत. गावात एकूण पाच वॉर्ड असून येथे अनेक शेतकऱ्यांकडे दोन ते तीन ट्रॅक्टर आहेत. शेतकरी अशोक बुद्धे, ज्ञानदेव परशुरामकर, भाष्कर नाकाडे, राजकुमार नाकाडे यांच्याकडे प्रत्येकी तीन ट्रॅक्टर आहेत. तर सतीश नाकाडे, भैय्याजी नाकाडे, लुनकरण नाकाडे, राजू धर्मा नाकाडे, नामदेव नाकाडे, केवळराम नाकाडे, गंगाधर सुंदरकर, प्रेमचंद तलमले, हर्षवर्धन नाकाडे, महेंद्र नाकाडे यांच्याकडे प्रत्येकी दोन ट्रॅक्टर असून एक ट्रॅक्टर असणारे शेतकरी ९० च्या आसपास आहेत.