शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

जंगली हत्तींच्या कळपाने घेतला यूटर्न; चिखलीत दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2021 05:00 IST

हत्तींचा कळप दिनांक ३ डिसेंबर राेजी रात्री पळसगाव महादेव पहाडी परिसरात दिसून आला. पळसगाव गावात पोहोचून गावाच्या शेवटी असलेल्या नागरिकांच्या अंगणातील केळींच्या झाडांची, तसेच घराची नासधूस केली. गावकऱ्यांनी हत्तींना पिटाळून लावले. हा कळप पाथरगोटामार्गे पुढे जाईल, असा अंदाज हाेता. मात्र, कळपाने ४ डिसेंबरला यूटर्न घेतला आहे. ते चिखली परिसरात पुन्हा दाखल झाले आहेत. 

लाेकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : हत्तींच्या कळपाने चिखली (रीठ) या परिसरातून  ३ डिसेंबर राेजी  काढता पाय घेत, ते आरमाेरी तालुक्यातील पळसगाव (पाथरगोटा) या परिसरात पाेहाेचले हाेते. पुढे ते पूर्वेकडे वाढाेना परिसरात जातील, अशी अपेक्षा हाेती. मात्र, यूटर्न घेत ते   पुन्हा ४ डिसेंबर राेजी चिखली परिसरात आले आहेत.हत्तींचा कळप दिनांक ३ डिसेंबर राेजी रात्री पळसगाव महादेव पहाडी परिसरात दिसून आला. पळसगाव गावात पोहोचून गावाच्या शेवटी असलेल्या नागरिकांच्या अंगणातील केळींच्या झाडांची, तसेच घराची नासधूस केली. गावकऱ्यांनी हत्तींना पिटाळून लावले. हा कळप पाथरगोटामार्गे पुढे जाईल, असा अंदाज हाेता. मात्र, कळपाने ४ डिसेंबरला यूटर्न घेतला आहे. ते चिखली परिसरात पुन्हा दाखल झाले आहेत. ४ डिसेंबरच्या रात्री त्यांनी चिखली गावाकडे माेर्चा वळविला. कळप गावाकडे येत असल्याचे लक्षात येताच, वनविभागाच्या पथकाने, तसेच गावकऱ्यांनी शेकाेट्या पेटवून, तसेच आरडाओरड करून गावाकडे येण्यास अटकाव केला. ते शेताच्या दिशेने निघून गेले. १ डिसेंबरच्या रात्री हत्तींनी चिखली येथील नित्यानंद बुद्धे यांच्या १५ एकरांतील धान पुंजण्याचे नुकसान केले हाेते. ४ डिसेंबरच्या रात्री पुन्हा त्याच ठिकाणी जाऊन हत्तींनी नुकसान केले. ५ डिसेंबर राेजी हा कळप चिखली येथील फुटका तलाव परिसरात आढळून आला.

चिखलीवासीयांची हाेताहे झाेपमाेडजंगली हत्तींचा कळप चिखली परिसरातच मागील आठ दिवसांपासून ठाण मांडून बसला आहे. गावाजवळ असलेल्या तलावात पुरेसे पाणी असल्याने हा कळप आणखी किती दिवस थांबणार हे सांगणे कठीण झाले आहे. दिवसभर तलाव परिसरात राहल्यानंतर रात्रीच्या सुमारास गावाकडे हा कळप येत असल्याने नागरिकांची झाेपमाेड हाेत आहे. कळप येऊ नये,यासाठी शेकाेट्या पेटविणे, गावातील युवकांना जागे ठेवणे, फटाके फाेडणे आदी उपक्रम केले जात आहेत. यामुळे गावातील नागरिकांची झाेपमाेड हाेत आहे. वन विभागाच्या पथकातील कर्मचारीही त्रस्त झाले आहेत.

 

टॅग्स :forest departmentवनविभाग