शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
3
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
4
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
5
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
6
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
7
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
9
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
10
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
11
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
12
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
13
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
14
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
15
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
16
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
17
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
18
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
19
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
20
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पाऊस मका पिकाच्या पथ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2021 05:00 IST

मका पिकाला इतर पिकांच्या तुलनेत कमी प्रमाणात पाण्याची गरज भासते. त्यामुळे शेतात विहीर, बाेअरवेल असलेले शेतकरी या पिकाची लागवड करतात. यावर्षी सुद्धा अधिक प्रमाणात लागवड हाेईल, असा अंदाज कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. सुरुवातीला मका हे पीक मूलचेरा व सिराेंचा तालुक्यातीलच शेतकरी लावत हाेते. मात्र अधिक उत्पादन मिळत असल्याने इतर शेतकरी सुद्धा या पिकाकडे वळत चालले आहेत.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : आठ दिवस सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतजमिनीतील ओलावा वाढला आहे. याचा फायदा रब्बी पिकांसह मका पिकाला हाेणार आहे. यामुळे यावर्षी जिल्ह्यात मका पिकाचे क्षेत्र वाढेल, असा अंदाज वर्तविला जात आहे.कमी खर्चात अधिक उत्पादन देणारे पीक म्हणून मक्याची ओळख निर्माण हाेत आहे. इतर रब्बी पिकांच्या तुलनेत चांगले उत्पादन हाेत असल्याने जिल्ह्यातील शेतकरी या पिकाकडे वळत चालला आहे. मागील वर्षी जवळपास पाच हजार हेक्टरवर मका पिकाची लागवड करण्यात आली हाेती. मागील वर्षी मक्याचे चांगले उत्पादन झाले. मका पिकाला इतर पिकांच्या तुलनेत कमी प्रमाणात पाण्याची गरज भासते. त्यामुळे शेतात विहीर, बाेअरवेल असलेले शेतकरी या पिकाची लागवड करतात. यावर्षी सुद्धा अधिक प्रमाणात लागवड हाेईल, असा अंदाज कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. सुरुवातीला मका हे पीक मूलचेरा व सिराेंचा तालुक्यातीलच शेतकरी लावत हाेते. मात्र अधिक उत्पादन मिळत असल्याने इतर शेतकरी सुद्धा या पिकाकडे वळत चालले आहेत. आता जिल्हाभरात या पिकाची लागवड केली जाते.

मशागतीला सुरुवातधानपीक निघताच मका पिकाची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांनी मशागतीला सुरुवात केली आहे. लवकर पेरणी केल्यास लवकर पीक निघते. मार्चपर्यंत पीक निघाल्यास पिकाला कमी प्रमाणात पाण्याची गरज भासते. तेवढा खर्च शेतकऱ्याचा वाचत असल्याने शक्यताे लवकर पेरणी हाेईल, यासाठी शेतकरी प्रयत्न करीत आहे.

खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची गरजमागील वर्षी मक्याला शासनाने १८५० रुपये प्रती क्विंटल आधारभूत किंमत ठरवून दिली हाेती. मात्र मका खरेदी अतिशय उशिरा सुरूवात झाली. ताेपर्यंत अनेक शेतकऱ्यांनी मका खासगी व्यापाऱ्यांना विकला हाेता. तसेच जिल्ह्यात हाेणाऱ्या उत्पादनापेक्षा खरेदीचे उद्दिष्ट कमी राहत असल्याने कमी शेतकऱ्यांचा मका खरेदी केला जातो. खासगी व्यापारी केवळ १४०० प्रती क्विंटल दराने मका खरेदी करतात. यामध्ये शेतकऱ्यांना फार माेठे नुकसान सहन करावे लागते. धानाप्रमाणेच मक्याचेही उद्दिष्ट वाढविण्याची गरज आहे. यावर्षी मका पिकाला १८७० रुपये हमी भाव ठरविला आहे.

 

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती