अवकाळी पाऊस मका पिकाच्या पथ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2021 05:00 AM2021-11-27T05:00:00+5:302021-11-27T05:00:34+5:30

मका पिकाला इतर पिकांच्या तुलनेत कमी प्रमाणात पाण्याची गरज भासते. त्यामुळे शेतात विहीर, बाेअरवेल असलेले शेतकरी या पिकाची लागवड करतात. यावर्षी सुद्धा अधिक प्रमाणात लागवड हाेईल, असा अंदाज कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. सुरुवातीला मका हे पीक मूलचेरा व सिराेंचा तालुक्यातीलच शेतकरी लावत हाेते. मात्र अधिक उत्पादन मिळत असल्याने इतर शेतकरी सुद्धा या पिकाकडे वळत चालले आहेत.

Untimely rains on maize crop diet | अवकाळी पाऊस मका पिकाच्या पथ्यावर

अवकाळी पाऊस मका पिकाच्या पथ्यावर

googlenewsNext

लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : आठ दिवस सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतजमिनीतील ओलावा वाढला आहे. याचा फायदा रब्बी पिकांसह मका पिकाला हाेणार आहे. यामुळे यावर्षी जिल्ह्यात मका पिकाचे क्षेत्र वाढेल, असा अंदाज वर्तविला जात आहे.
कमी खर्चात अधिक उत्पादन देणारे पीक म्हणून मक्याची ओळख निर्माण हाेत आहे. इतर रब्बी पिकांच्या तुलनेत चांगले उत्पादन हाेत असल्याने जिल्ह्यातील शेतकरी या पिकाकडे वळत चालला आहे. मागील वर्षी जवळपास पाच हजार हेक्टरवर मका पिकाची लागवड करण्यात आली हाेती. मागील वर्षी मक्याचे चांगले उत्पादन झाले. 
मका पिकाला इतर पिकांच्या तुलनेत कमी प्रमाणात पाण्याची गरज भासते. त्यामुळे शेतात विहीर, बाेअरवेल असलेले शेतकरी या पिकाची लागवड करतात. यावर्षी सुद्धा अधिक प्रमाणात लागवड हाेईल, असा अंदाज कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. सुरुवातीला मका हे पीक मूलचेरा व सिराेंचा तालुक्यातीलच शेतकरी लावत हाेते. मात्र अधिक उत्पादन मिळत असल्याने इतर शेतकरी सुद्धा या पिकाकडे वळत चालले आहेत. आता जिल्हाभरात या पिकाची लागवड केली जाते.

मशागतीला सुरुवात
धानपीक निघताच मका पिकाची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांनी मशागतीला सुरुवात केली आहे. लवकर पेरणी केल्यास लवकर पीक निघते. मार्चपर्यंत पीक निघाल्यास पिकाला कमी प्रमाणात पाण्याची गरज भासते. तेवढा खर्च शेतकऱ्याचा वाचत असल्याने शक्यताे लवकर पेरणी हाेईल, यासाठी शेतकरी प्रयत्न करीत आहे.

खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची गरज
मागील वर्षी मक्याला शासनाने १८५० रुपये प्रती क्विंटल आधारभूत किंमत ठरवून दिली हाेती. मात्र मका खरेदी अतिशय उशिरा सुरूवात झाली. ताेपर्यंत अनेक शेतकऱ्यांनी मका खासगी व्यापाऱ्यांना विकला हाेता. तसेच जिल्ह्यात हाेणाऱ्या उत्पादनापेक्षा खरेदीचे उद्दिष्ट कमी राहत असल्याने कमी शेतकऱ्यांचा मका खरेदी केला जातो. खासगी व्यापारी केवळ १४०० प्रती क्विंटल दराने मका खरेदी करतात. यामध्ये शेतकऱ्यांना फार माेठे नुकसान सहन करावे लागते. धानाप्रमाणेच मक्याचेही उद्दिष्ट वाढविण्याची गरज आहे. यावर्षी मका पिकाला १८७० रुपये हमी भाव ठरविला आहे.

 

Web Title: Untimely rains on maize crop diet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.