शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करा, अन्यथा जिल्हाभर आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:53 IST

गडचिराेली : गडचिराेली जिल्ह्यातील ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के करावे, अन्यथा जिल्हाभर आंदाेलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रीय ...

गडचिराेली : गडचिराेली जिल्ह्यातील ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के करावे, अन्यथा जिल्हाभर आंदाेलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाने दिला.

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ना. यड्रावकर जिल्हा दाैऱ्यावर आले असता, त्यांना ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. ओबीसी आरक्षण १९९७ ते २००२ या कालावधीत १९ टक्क्यांवरून ६ टक्क्यांवर आणल्याने ओबीसी युवा नोकरीपासून वंचित आहेत. नोकऱ्या नसल्यामुळे ओबीसी युवकांमध्ये नैराश्य आहे. महाआघाडी सरकारने ओबीसींचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के करून ओबीसी समाजाला न्याय द्यावा, अन्यथा ओबीसी युवक जिल्हाभर आंदोलन करतील, असा इशारा देण्यात आला. ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करण्यात यावी, गडचिरोली येथे ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यांकरिता स्वतंत्र वसतिगृह सुरू करण्यात यावे. ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती लवकर द्यावी आदी मागण्यांचा समावेश निवेदनात हाेता. निवेदन देताना राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष राहुल मुनघाटे, जिल्हा महासचिव राहुल भांडेकर, जिल्हा सचिव आशिष रोहणकर, तालुकाध्यक्ष तुषार बोरकुटे, कुमोद बोरकुटे, सचिन सोनटक्के, हर्षद वैरागडे उपस्थित होते.