दारू सोडण्यासाठी व्यसनींवर उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2020 05:00 AM2020-06-30T05:00:00+5:302020-06-30T05:01:04+5:30

सर्चद्वारे मुक्तिपथ अंतर्गत गावपातळीवर एकदिवसीय उपचार क्लिनिक सुरू केले आहे. गावात रीतसर ठराव घेऊन क्लिनिकद्वारे उपचार केले जात आहेत. अशाच प्रकारे चामोर्शी तालुक्यातील मुरखळा चक येथे शनिवारी व्यसन उपचार शिबिर घेण्यात आले. या शिबिरात सहभागी व्यसनींनी दारू पिल्यामुळे तसेच दारू न पिल्यामुळे होत असलेले त्रास सांगितले.

Treatment for alcohol addiction | दारू सोडण्यासाठी व्यसनींवर उपचार

दारू सोडण्यासाठी व्यसनींवर उपचार

Next
ठळक मुद्देमुरखळा चक येथे शिबिर : १७ नागरिकांचे समुपदेशन; दुष्परिणाम सांगून व्यसन न करण्याबाबत मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : दारूच्या व्यसनामुळे होत असलेला रुग्णांचा त्रास कमी करण्यासाठी तालुक्यातील मुरखळा चक येथे व्यसन उपचार शिबिर घेण्यात आले. यावेळी १७ व्यसनींवर उपचार व समुपदेशन करण्यात आले.
सर्चद्वारे मुक्तिपथ अंतर्गत गावपातळीवर एकदिवसीय उपचार क्लिनिक सुरू केले आहे. गावात रीतसर ठराव घेऊन क्लिनिकद्वारे उपचार केले जात आहेत. अशाच प्रकारे चामोर्शी तालुक्यातील मुरखळा चक येथे शनिवारी व्यसन उपचार शिबिर घेण्यात आले. या शिबिरात सहभागी व्यसनींनी दारू पिल्यामुळे तसेच दारू न पिल्यामुळे होत असलेले त्रास सांगितले. दारूचे व्यसन असलेल्या व्यक्तींनी दारू न पिल्यास त्यांचे हात थरथरणे, कानामध्ये वेगवेगळा आवाज येणे, थकवा जाणवणे असे प्रकार घडतात. या सर्व प्रकारामागचे मूळ कारण समजावून सांगत अरुण भोसले यांनी व्यसनींचे समुपदेशन केले. हळूहळू दारू सोडणे कशा पद्धतीने शक्य आहे याविषयी सुद्धा त्यांनी मार्गदर्शन केले. सातत्याने दारू पिण्याची सवय असलेल्यांना दवाखान्यात उपचार घेण्याचा सल्ला देण्यात आला. मुक्तिपथ तालुका उपसंघटक विनायक कुनघाडकर आणि शिबिर संयोजक छत्रपती घवघवे यांनी क्लिनिकचे नियोजन केले.

कोचिनारा येथे १० व्यसनींवर उपचार
कोरची तालुक्यातील कोचिनारा गावातही शनिवारी व्यसन उपचार शिबिर घेण्यात आले. दारूचे व्यसन सोडण्याची इच्छा असलेल्या १० जणांवर शिबिरात उपचार करण्यात आला. दारूचे व्यसन हा एक आजार आहे व कुठलाही आजार उपचाराने बरा होतो, ही बाब समजावून सांगत आवश्यक औषधोपचारही करण्यात आले.

Web Title: Treatment for alcohol addiction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.