शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
3
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
4
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
5
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
6
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
7
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
8
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
9
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
10
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
11
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
12
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
13
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
14
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
15
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
16
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
17
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
18
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
19
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
20
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

डिझेलचे दर वाढल्याने ट्रॅक्टरद्वारे मशागत महागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:53 IST

१० वर्षांपूर्वी माेजक्याच शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टर व अन्य यंत्रे हाेती. याचा वापर मर्यादित स्वरुपात केला जायचा. परंतु आता. बहुतांश शेतकरी ...

१० वर्षांपूर्वी माेजक्याच शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टर व अन्य यंत्रे हाेती. याचा वापर मर्यादित स्वरुपात केला जायचा. परंतु आता. बहुतांश शेतकरी ट्रॅक्टर व अन्य यंत्रांचा वापर करुन शेती करीत आहे. केंद्र व राज्य शासनाच्या अनेक याेजना शेतकऱ्यांसाठी फायदेशिर ठरत आहेत. या याेजनांचा लाभ घेऊन शेतकरी अनुदानावर ट्रॅक्टरसह विविध अवजारे व उपकरणे खरेदी करीत आहेत. बहुतांश गावांमध्ये मजुरांचा तुटवडा जाणवत असल्याने शेतकरी बाहेरुन मजूर आणून धान राेवणी, िनंदण, धान कापणी व शेतातील विविध पिकांची मशागत करीत आहेत. यासाठी त्यांना गावातील मजुरीपेक्षा अधिकची मजुरी द्यावी लागते. त्यातच दरवर्षी डिझेलचे दर वाढत असल्याने ट्रॅक्टरचे भाडे दिवसेंदिवस वाढत आहे. एकरी मशागतीचा खर्च वाढत आहे. साधने व पैसा नसलेले अनेक शेतकरी शेती कसणे साेडून बाहेरगावी मजुरीला जाणे पसंत करतात. अनेक शेतकरी भाडेतत्त्वावर शेती दुसऱ्या लाेकांना देतात.

मशागतीचे दर (प्रती तास)

नांगरणी -७००, ८००

राेटावेटर-८००, १०००

पेरणी-८००,१०००

चिखलणी-७००,८००

बाॅक्स

मशागतीचा एकरी खर्च

४५०० रुपये

शेतात नांगरणीपासून पीक निघेपर्यंत शेतकऱ्याला पैसा खर्च करावा लागताे. पेरणीपूर्व मशागतीसाठी शेतकऱ्यांना सुरूवातीला नांगरणी करावी लागते. त्यानंतर पुन्हा पेरणीसाठी जमीन नांगरुन धान्य टाकावे लागते. यासाठी एकरी जवळपास २ हजार ते २ हजार ५०० रुपये खर्च हाेतात.

खरीप हंगामात धान राेवणीपूर्वी शेतीची नांगरणी व त्यानंतर चिखलणीसाठी ट्रॅक्टरचा वापर करावा लागताे. यावर एकरी जवळपास २ हजार रुपयांचा खर्च हाेताे.

धानपीक, साेयाबिन, कापूस पिकासाठी वेगवेगळा खर्च मशागत करताना करावा लागताे. धान पिकाच्या अनुषंगाने एकरी जवळपास ४ हजार ५०० रुपयांचा खर्च शेतकऱ्यांना करावा लागताे तर साेयाबिन व कापसाच्या मशागतीचा खर्च अधिक येऊ शकताे.

काेट...

पारंपरिक पद्धतीने माेजकेच शेतकरी शेती कसत आहेत. बहुतांश शेतकऱ्यांकडे बैलजाेडी नसल्याने भाड्याने ट्रॅक्टर करुन नांगरणी व चिखलणीची कामे केली जातात. परंतु दिवसेंदिवस ट्रॅक्टरचे दर वाढत आहेत.

लाेमेश भाेयर, शेतकरी

ट्रॅक्टरद्वारे मशागत करताना काम लवकर हाेत असले तरी, दरवर्षी हाेणाऱ्या भाडेवाढीमुळे शेतकरी त्रस्त आहेत. परंतु लवकर काम करण्याची आशा व नाईलाज यामुळे शेतकरी ट्रॅक्टरचा वापर करतात.

सुनील करकाडे, शेतकरी

गडचिराेली जिल्ह्यात खरीप हंगामात ट्रॅक्टरद्वारे सर्वाधिक मशागत केली जाते. रबी हंगामात ट्रॅक्टरला कमी प्रमाणात मागणी असते. दाेन्ही हंगामात शेती कसणारे बहुतांश शेतकरी ट्रॅक्टरद्वारे मशागतीला प्राधान्य देतात. परंतु दिवसेंदिवस डिझेलचे दर वाढत असल्याने जुन्याच दरात ट्रॅक्टर भाड्याने मशागतीसाठी नेणे परवडत नाही. नाईलाजास्तव दरवाढ करावी लागते.

जगदीश मुनघाटे, ट्रॅक्टर मालक