शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

तंबाखूजन्य साहित्य जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 05:00 IST

तंबाखूजन्य पदार्थाचा तुटवडा असल्याने त्याची चढत्या भावाने विक्री होत आहे. शहरातील किराणा दुकानांवर पोलिसांची करडी नजर असल्याने येथील विक्री बंद असली तरी ग्रामीण भागात ही विक्री सुरू असल्याचे आढळून आले. मुक्तिपथ कार्यकर्त्यांच्या लक्षात येताच त्यांनी गावांमधील अशा दुकानांमध्ये धाड टाकून तंबाखूजन्य साहित्य जप्त करून नष्ट केले.

ठळक मुद्देदुकानावर धाड : गडचिरोलीसह आरमोरी,अहेरी तालुक्यात कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने वर्षभरासाठी सर्वच प्रकारच्या तंबाखूजन्य पदार्थावर बंदी घातली आहे. असे असतांनाही किराणा दुकानांतून त्याची विक्री होत आहे. अशा किराणा दुकानांची पोलीस पाटील आणि मुक्तिपथ गाव संघटनांच्या सहकार्याने झडती घेत मुक्तिपथ तालुका कार्यकर्त्यांनी अनेक दुकानांतून खर्रा व तंबाखूजन्य पदार्थ जप्त करून नष्ट केले. सदर कारवाई गडचिरोली, आरमोरी, अहेरी, भामरागड, चामोर्शी, देसाईगंज आदी सहा तालुक्यात करण्यात आली.तंबाखूजन्य पदार्थाचा तुटवडा असल्याने त्याची चढत्या भावाने विक्री होत आहे. शहरातील किराणा दुकानांवर पोलिसांची करडी नजर असल्याने येथील विक्री बंद असली तरी ग्रामीण भागात ही विक्री सुरू असल्याचे आढळून आले. मुक्तिपथ कार्यकर्त्यांच्या लक्षात येताच त्यांनी गावांमधील अशा दुकानांमध्ये धाड टाकून तंबाखूजन्य साहित्य जप्त करून नष्ट केले. आरमोरी तालुक्यातील कुरंझा व पळसगाव येथील किराणा दुकानांमध्ये तपासणी केली असता सुगंधित तंबाखू व इतरही साहित्य सापडले. त्याचबरोबर पानठेलाधारकांच्या घराची झडती घेतली असता तिथेही मुद्देमाल सापडला. हे सर्व साहित्य नष्ट करण्यात आले. किराणा दुकाने अत्यावश्यक सेवेत येत असली तरी दुपारी १२ पर्यंतच ती सुरू ठेवण्याची परवानगी आहे. पण गावांमध्ये या नियमाला डावलून दिवसभर दुकाने सुरू असतात व त्यातून तंबाखूजन्य पदार्थाची विक्री होत आहे.गडचिरोली तालुक्यातील पोटेगाव आणि काटली येथील किराणा दुकानांची तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात मझा सुगंधित तंबाखू व सिगारेटची पाकिटे सापडली. अहेरी तालुक्यात महागाव बू. आणि महागाव खुर्द येथील तब्बल २१ दुकानांची तपासणी करून तंबाखूजन्य पदार्थ न विकण्याचे आवाहन केले. तीन दुकानात सापडले साहित्य नष्ट केले. चामोर्शी तालुक्यात पावीमुरांडा या गावी ७ दुकानांची तपासणी केली. २ दुकानांमध्ये सापडलेला तंबाखूजन्य पदार्थांचा साठा त्यांनी नष्ट केला. वडसा तालुक्यातील तुळशी या गावी एका दुकानातून गुडाखूचा मोठा साठा जप्त केला.भामरागड तालुक्यातील कुक्कामेटा या गावी दुकानदारांना समज देत तंबाखूजन्य पदार्थ व खर्रा बनविण्याचे साहित्य जप्त केले. किराणा दुकानामधून तंबाखूजन्य पदार्थांची विक्री बंद करावी आणि कोरोना विरोधात लढण्यासाठी शासनाला सहकार्य करण्याचे आवाहन मुक्तिपथने केले.

टॅग्स :Tobacco Banतंबाखू बंदी