शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
10
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
11
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
12
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
13
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
14
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
15
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
16
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
17
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
18
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
19
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
20
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

तीन वर्षांपासून ‘राेहयाे’चा कुशल निधी रखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:35 IST

आरमाेरी : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत आरमोरी तालुक्यात कुशल कामांचा काेट्यवधी रुपयांचा निधी गेल्या तीन वर्षांपासून मिळाला नाही. ...

आरमाेरी : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत आरमोरी तालुक्यात कुशल कामांचा काेट्यवधी रुपयांचा निधी गेल्या तीन वर्षांपासून मिळाला नाही. त्यामुळे ग्रामपंचायतींना साहित्य पुरवठा करणारे पुरवठादार आर्थिक संकटात सापडले आहेत. पंचायत समिती कार्यालयात वारंवार हेलपाटे त्यांना मारावे लागत आहेत.

ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगार मिळावा व त्यांच्या हाताला काम मिळावे यासाठी शासनाची रोजगार हमी योजना आहे. या योजनेंतर्गत तीन वर्षांपूर्वी आरमोरी तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये सिमेंट रोड, नाली बांधकाम, सिमेंट बंधारे, मोरी बांधकाम, पूल, आदी विविध प्रकारची कुशल कामे करण्यात आली. ग्रामपंचायत स्तरावर होणाऱ्या विकासकामांच्या बांधकामाला साहित्य पुरवठा करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवून कमी रेटने साहित्य पुरवठा करणाऱ्या पुरवठादारांना हे काम देण्यात आले. पुरवठादारांकडून ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आलेल्या कुशल कामांना सिमेंट, लोहा, गिट्टी व इतर साहित्यांचा पुरवठा करण्यात आला. आरमोरी तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींमध्ये नरेगाअंतर्गत विविध कुशलची कामे करण्यात आली. मात्र, कुशल कामांना साहित्य पुरवठा करणाऱ्या अनेक पुरवठादारांचे काेट्यवधी रुपयांच्या साहित्याचे बिल गेल्या तीन वर्षांपासून शासनाकडे प्रलंबित आहे. त्यामुळे पुरवठादार आर्थिक संकटात सापडले आहेत.

बाॅक्स

ग्रामपंचायतींना साहित्य काेण पुरविणार?

कुशल कामांचा निधी रखडल्याने पुरवठादारांच्या व्यवसायावर विपरीत परिणाम झाला आहे. साहित्य पुरवठा करणाऱ्या दुकानदारांवर संक्रांत आहे. निधीसाठी अजून किती काळ वाट पहायची, अशी संतप्त प्रतिक्रिया एका पुरवठादाराने दिली आहे. कुशल कामाचा प्रलंबित असलेला निधी तीन-तीन वर्ष मिळत नसेल, तर ग्रामपंचायतीला विकासकामासाठी साहित्य पुरवठा करणार कोण? असा प्रश्नही उपस्थित केला आहे. निधी रखडल्याने अन्य विकासकामे प्रभावित होणार आहेत. त्यामुळे कुशल कामाचा निधी तत्काळ उपलब्ध करून देऊन पुरवठादारांना आर्थिक संकटातून बाहेर काढावे, अशी मागणी करण्यात येत आहे.