शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

तीन महिन्यांत पेट्राेल 5 तर सिलिंडर 100 रुपयांनी महागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 05:00 IST

पेट्राेल व डिझेलच्या किमतीमध्ये दरदिवशी काही पैशांची वाढ केली जाते. ही वाढ ग्राहकांच्या नजरेस पडत नाही. मात्र, महिनाभरात पेट्राेलच्या दरात २ ते ३ रुपयांची वाढ होते. पेट्राेलचे दर आता ९४ रुपयांच्या पुढे  पाेहाेचले असून पुढील एक-दाेन महिन्यांत शंभरी पार करतील, असा अंदाज आहे. डिझेलच्या दरातही वाढ हाेत आहे. त्यामुळे वाहतुकीचा खर्च वाढून याचा थेट परिणाम इतर वस्तूंच्या किमतीवर हाेत असल्याचे दिसून येत आहे. 

ठळक मुद्देलाॅकडाऊनमधून सावरताना भाववाढीचे चटके अन् महागाईचे फटके

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : काेराेनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लाॅकडाऊनमध्ये अनेकांचे दिवाळे निघाले. यातून स्वत:ला सावरण्याचा  प्रयत्न करीत असतानाच महागाईचे फटके नागरिकांना सहन करावे लागत आहेत. गेल्या तीन महिन्यांमध्ये डिझेलच्या दरात ६.२८ रुपये, पेट्राेलच्या दरात ५.०६ रुपये व गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल १०० रुपयांनी वाढ झाली आहे. उज्ज्वला याेजनेंतर्गत शासनाने हजारो कुटुंबाला गॅस सिलिंडर उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातही आता गॅस सिलिंडर पाेहाेचून गॅसवर स्वयंपाक करण्याची सवय महिलांना झाली आहे; पण पेट्रोल व डिझेलप्रमाणेच गॅसचा हंडाही अवाक्याबाहेर गेल्याने अनेक घरांत पुन्हा चूल पेटायला लागली आहे.पेट्राेल व डिझेलच्या किमतीमध्ये दरदिवशी काही पैशांची वाढ केली जाते. ही वाढ ग्राहकांच्या नजरेस पडत नाही. मात्र, महिनाभरात पेट्राेलच्या दरात २ ते ३ रुपयांची वाढ होते. पेट्राेलचे दर आता ९४ रुपयांच्या पुढे  पाेहाेचले असून पुढील एक-दाेन महिन्यांत शंभरी पार करतील, असा अंदाज आहे. डिझेलच्या दरातही वाढ हाेत आहे. त्यामुळे वाहतुकीचा खर्च वाढून याचा थेट परिणाम इतर वस्तूंच्या किमतीवर हाेत असल्याचे दिसून येत आहे. 

डिझेलच्या किमतीत वाढ हाेत आहे. त्यामुळे वाहतुकीचे दर वाढविल्याशिवाय पर्याय राहत नाही. मात्र, ग्राहकाला वाढीव वाहतुकीच्या दराविषयी सांगितल्यास ते वाढलेला दर मान्य करीत नाही. त्यामुळे वाहन चालकांना काही प्रमाणात नफा कमी करून व्यवसाय करावा लागत आहे. दरदिवशी डिझेलमध्ये हाेणारी वाढ जनतेच्या लक्षात येत नाही. याचा फटका वाहनधारकांना बसत आहे.- संदीप डाेईजड, वाहन मालक

शहरात सिलिंडरवरील स्वयंपाकाशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे दर वाढत असले तरी ते खरेदी करावी लागत आहे. पूर्वीच्या तुलनेत शासनाने सबसिडी कमी केली आहे. ४०० ते ५०० रुपयांत उपलब्ध हाेणाऱ्या सिलिंडरसाठी आता ७५० रुपये माेजावे लागत आहेत. शासनाने सिलिंडरचे दर कमी करावेत.- मनीषा सेलाेटे, गृहिणी

पेट्राेल ही अत्यावश्यक गरज बनली आहे. त्यामुळे कितीही वाढ झाली तरी ते खरेदी करावे लागणार आहे. याचा गैरफायदा शासनाकडून घेतला जात आहे. पेट्राेल व डिझेलवर विविध प्रकारचे कर शासनाकडून लावले जात असल्याने या वस्तू महाग होत चालल्या आहेत. पेट्राेल व डिझेलचे महत्त्व लक्षात घेऊन त्यावरील कर कमी करण्याची गरज आहे.- शिवराम चरडुके, नागरिक

 

टॅग्स :Petrolपेट्रोलCylinderगॅस सिलेंडर