शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

जयरामपूर नदी घाटातून १,०७४ ब्रास रेतीची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 06:00 IST

जयरामपूर रेती घाटाचा कंत्राट मूल येथील हसन वाढई यांना देण्यात आला होता. ३० सप्टेंबरनंतर नदीतून रेतीचा उपसा करण्याची मुदत संपली असतानाही रेती कंत्राटदार रात्रीच्या सुमारास नदीतून रेतीचा उपसा करून जुन्या रेतीच्या ढिगावर नेऊन टाकत होता. जयरामपूरच्या महिला तलाठी एल. एस. होळी यांनी आष्टी पोलिसांच्या मदतीने शनिवारी सकाळी धाड टाकून रेतीने भरलेले सात हायवा ट्रक व नदी पात्रातील तीन पोकलँड मशीन जप्त केल्या.

ठळक मुद्देतहसीलदारांकडे अहवाल : जुन्या कंत्राटदाराचा चोरीत सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : वैनगंगा नदीच्या जयरामपूर रेती घाटावरून सुमारे १ हजार ७४ ब्रॉस रेतीची चोरी करण्यात आली असल्याचे महसूल विभागाने केलेल्या मोजणीत आढळून आले आहे. सदर कंत्राटदारावर १ कोटी ३२ लाख रुपयांचा दंड आकारला जाणार आहे.जयरामपूर रेती घाटाचा कंत्राट मूल येथील हसन वाढई यांना देण्यात आला होता. ३० सप्टेंबरनंतर नदीतून रेतीचा उपसा करण्याची मुदत संपली असतानाही रेती कंत्राटदार रात्रीच्या सुमारास नदीतून रेतीचा उपसा करून जुन्या रेतीच्या ढिगावर नेऊन टाकत होता. जयरामपूरच्या महिला तलाठी एल. एस. होळी यांनी आष्टी पोलिसांच्या मदतीने शनिवारी सकाळी धाड टाकून रेतीने भरलेले सात हायवा ट्रक व नदी पात्रातील तीन पोकलँड मशीन जप्त केल्या.दुसऱ्या दिवशी मंडळ अधिकारी राऊत, तलाठी सी. डी. नाईक यांनी नदी पात्राचे मोजमाप केले असता, सुमारे १ हजार ७४ ब्रॉस रेतीची चोरी झाल्याचे आढळून आले. एका रेती ब्रॉसवर १२ हजार ३०० रुपये दंड आकारला जातो. त्यानुसार रेतीची किंमत १ कोटी ३२ लाख रुपये एवढी होते. मंडळ अधिकाऱ्यांनी मोजमाप करून अहवाल चामोर्शी तहसीलदारांकडे सादर केला आहे. रेती चोरीबाबत निर्णय घेण्याचा अधिकार तहसीलदार यांना आहे. नियमानुसार रेती तस्करावर दंड आकारला जाण्याची अपेक्षा आहे. ट्रकवर प्रत्येकी दोन लाख रुपये दंड तसेच पोकलँडवरही दंड आकारला जाणार आहे. मोजणी करतेवेळी सहायक पोलीस निरिक्षक धमेंद्र मडावी, संघरक्षीत फुलझेले हजर होते.

टॅग्स :sandवाळू