शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

मार्कंडातील कामाची दिल्लीची चमू करणार पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2022 05:00 IST

देवस्थानच्या विश्वस्थांनी अनेक वेळा निवेदने देऊनही त्याकडे पुरातत्त्व विभागाने पूर्णतः दुर्लक्ष केले होते. अप्रतिम शिल्पकलेचा नमुना असलेल्या मार्कंडा पर्यटनस्थळाचा विकास व्हावा व मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा म्हणून सातत्याने प्रयत्न सुरू होते. अखेर खासदार अशोक नेते यांनी पुरातत्व विभागाच्या अतिरिक्त महानिर्देशकांच्या ही बाब निदर्शनास आणून दिली. रखडलेले मार्कंडा देवस्थानच्या जीर्णोद्धाराचे काम विनाविलंब पूर्ण करण्यास त्यांना सांगितले. 

लाेकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : मार्कंडादेव येथील प्रसिद्ध शिवमंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम गेल्या ४ ते ५ वर्षांपासून रखडले आहे. पण आता हे काम मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली आहे. खासदार अशोक नेते यांनी दिल्लीत पुरातत्त्व विभागाच्या अतिरिक्त महानिर्देशकांची भेट घेऊन त्यांनी परिस्थितीची जाणीव करून दिली. त्यामुळे येत्या १० दिवसांत पुरातत्त्व विभागाची एक चमू संपूर्ण बांधकामाची पाहणी करण्यासाठी येणार आहे. या धार्मिक पर्यटनस्थळाच्या विकासाच्या दृष्टीने ही चमू सर्वेक्षण करणार असल्याचे अतिरिक्त महानिर्देशकांनी खासदार नेते यांना कळविले. देवस्थानच्या विश्वस्थांनी अनेक वेळा निवेदने देऊनही त्याकडे पुरातत्त्व विभागाने पूर्णतः दुर्लक्ष केले होते. अप्रतिम शिल्पकलेचा नमुना असलेल्या मार्कंडा पर्यटनस्थळाचा विकास व्हावा व मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा म्हणून सातत्याने प्रयत्न सुरू होते. अखेर खासदार अशोक नेते यांनी पुरातत्व विभागाच्या अतिरिक्त महानिर्देशकांच्या ही बाब निदर्शनास आणून दिली. रखडलेले मार्कंडा देवस्थानच्या जीर्णोद्धाराचे काम विनाविलंब पूर्ण करण्यास त्यांना सांगितले. 

केंद्रीय पर्यटनस्थळांच्या यादीत येणार

खासदार अशोक नेते यांनी पुरातत्त्व विभागाच्या एडीजी यांच्याशी चर्चा करताना सांगितले की, मार्कंडा देवस्थान महाराष्ट्रातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र व धार्मिक पर्यटनस्थळ आहे. यात्रेदरम्यान लाखो भाविकांची उपस्थिती राहत असल्याने त्यांना सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी मार्कंडा परिसराचा सर्वांगीण विकास होणे गरजेचे आहे. लोकसभेतही त्यांनी हा प्रश्न उपस्थित करून पुरातत्त्व खात्याचे लक्ष वेधले होते.

मार्कंडा या पर्यटनस्थळाला केंद्रीय पर्यटनस्थळांच्या यादीत समावेश करून विकास करण्याची मागणी त्यांनी केली होती. त्याची दखल घेऊन मंदिर जीर्णोद्धाराचे काम पूर्ण करण्यासोबत या ठिकाणी विकासकामांसाठी निधी मंजूर करण्यात येणार आहे. त्यासाठीच केंद्रीय चमूद्वारे पाहणी केली जाणार असल्याचे खा. अशोक नेते यांनी सांगितले.

 

टॅग्स :tourismपर्यटन