शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

वीजजोडणी घेण्याकडे मंडळाची पाठ

By admin | Updated: September 20, 2015 01:53 IST

महावितरणच्या वतीने गणेशोत्सवादरम्यान सार्वजनिक गणेश मंडळांना सवलतीच्या दरात वीजजोडणी व वीजदर उपलब्ध करून देण्यात आले आहे.

गणेशोत्सवासाठी : जिल्ह्यात केवळ ३० मंडळांनीच घेतली अधिकृत वीजजोडणीगडचिरोली : महावितरणच्या वतीने गणेशोत्सवादरम्यान सार्वजनिक गणेश मंडळांना सवलतीच्या दरात वीजजोडणी व वीजदर उपलब्ध करून देण्यात आले आहे. असे असतानाही जिल्ह्यातील एकूण ४०९ सार्वजनिक गणेश मंडळांपैकी केवळ ३० मंडळांनीच महावितरणकडून अधिकृत वीजजोडणी घेतली आहे. अधिकृत वीज जोडणीसाठी मंडळांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याने बहुतांश गणेश मंडळांनी अधिकृत वीजजोडणी घेण्याकडे पाठ फिरविली असल्याचे दिसून येत आहे. गडचिरोली जिल्ह्यात महावितरणचे गडचिरोली व अहेरी दोन विभाग आहे. तर १२ तालुकास्तरावर १२ उपविभाग आहेत. महावितरणकडून मिळालेल्या माहितीनुसार अहेरी उपविभागांतर्गत आठ, चामोर्शी उपविभागांतर्गत सात, सिरोंचा उपविभागांतर्गत दोन, गडचिरोली उपविभागांतर्गत नऊ, देसाईगंज उपविभागांतर्गत चार अशा एकूण ३० सार्वजनिक गणेश मंडळांनी महावितरणकडून अधिकृत वीज जोडणी घेतली आहे. उर्वरित ३७९ सार्वजनिक गणेश मंडळांनी महावितरणकडून अधिकृत वीज जोडणी घेतली नसल्याची माहिती मिळाली आहे. महावितरणकडून अधिकृत वीज जोडणी न घेतलेल्या सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये मुलचेरा, एटापल्ली, भामरागड, आरमोरी, धानोरा, कुरखेडा व कोरची वीज उपविभागाच्या हद्दीत असलेल्या मंडळाचा समावेश आहे.भरारी पथकाकडून कारवाई होणार का?उत्सव काळात वीज चोरीवर आळा घालण्यासाठी महावितरणच्या वतीने दामिनी नावाच्या भरारी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. सदर पथकातील अधिकारी आता जिल्हाभरात फिरून कोणते सार्वजनिक गणेश मंडळ अनाधिकृत वीज पुरवठ्याचा लाभ घेत आहेत. हे शोधणार आहेत. अनाधिकृत वीज घेतलेल्या सार्वजनिक गणेश मंडळावर भरारी पथक कारवाई करणार काय असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.‘महावितरण गणपती मंडळांच्या दारी’ मोहीम सुरूगणेशोत्सव काळात सार्वजनिक गणेश मंडळांकडून होणारी वीज चोरी रोखण्यासाठी गडचिरोली येथील महावितरणच्या वतीने ‘महावितरण गणपती मंडळाच्या दारी’ ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत सार्वजनिक गणेश मंडळांना अधिकृत वीज पुरवठा उपलब्ध करून दिला जात आहे. सोबतच गणेश मंडळाच्या वीज पुरवठ्याची तपासणी सुरू आहे, अशी माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली.