शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांचे उपोषण सुरूच

By admin | Updated: May 11, 2017 01:56 IST

जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत असलेल्या शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया यावर्षी राबविण्यात यावी,

जि. प. पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट : शिक्षक संघटनांचा पाठिंबा लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत असलेल्या शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया यावर्षी राबविण्यात यावी, या मुख्य मागणीसाठी दुर्गम भागातील अन्यायग्रस्त शिक्षक संघटनेच्या वतीने मंगळवारी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करून साखळी उपोषणाला प्रारंभ करण्यात आला. बुधवारीही उपोषण सुरूच होते. दुर्गम भागातील शिक्षकांच्या या आंदोलनाला जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनेने पाठिंबा दर्शविला आहे. जिल्हा परिषद अधिनस्त प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या संदर्भात कार्यवाही करण्याबाबत तसेच इतर मागण्यांसंदर्भात कार्यवाही करण्यासाठी दुर्गम भागातील शिक्षकांनी साखळी उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला प्राथमिक शिक्षक समिती, प्राथमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, महाराष्ट्र राज्य कॉस्ट्राईब शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य पदवीधर व केंद्रप्रमुख शिक्षक संघ, कॉस्ट्राईब कल्याण महासंघ आदी संघटनांच्या जिल्हाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन पाठिंबा जाहीर केला आहे. उपोषण स्थळाला जि. प. अध्यक्ष योगिता भांडेकर, कृषी व पशुसंवर्धन सभापती नाना नाकाडे, जि. प. सदस्य लता पुंघाटे, प्रा. रमेश बारसागडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, शिक्षणाधिकारी नानाजी आत्राम, उपशिक्षणाधिकारी मनमोहन चलाख, माजी पं. स. उपसभापती केशव भांडेकर यांनी भेट देऊन शिक्षकांच्या समस्या जाणून घेतल्या. अनेक वर्षांपासून बदली प्रक्रिया रखडल्याने दुर्गम भागातील शिक्षकांवर अन्याय झाला आहे. शासन स्तरावर पाठपुरावा करून समस्या सोडविण्याचे आश्वासन यावेळी दिले. साखळी उपोषणाला सिरोंचा तालुक्यातील शिक्षक सहारे, चौधरी, जांभुळे, कोरेटी, शेंडे, एटापल्लीतील वट्टी, वेलादी, कुमरे, ओंडरे आदी बसलेले आहेत.