धानाच्या चुकाऱ्याबाबत तहसीलदारांशी चर्चा

By Admin | Updated: July 17, 2015 01:44 IST2015-07-17T01:44:45+5:302015-07-17T01:44:45+5:30

तालुक्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या धानाचे चुकारे तत्काळ देण्यात यावे या मागणीसाठी तालुका काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस ...

Talk to tahsildars regarding cheating of the donation | धानाच्या चुकाऱ्याबाबत तहसीलदारांशी चर्चा

धानाच्या चुकाऱ्याबाबत तहसीलदारांशी चर्चा

आठ कोटी थकले : काँग्रेस व राकाँचा पुढाकार
कोरची : तालुक्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या धानाचे चुकारे तत्काळ देण्यात यावे या मागणीसाठी तालुका काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने गुरूवारी आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र आंदोलनापूर्वीच तहसीलदारांनी चर्चेसाठी बोलाविल्याने आंदोलकांनी आंदोलन मागे घेऊन तहसीलदारांसोबत चर्चा केली.
चर्चेदरम्यान गडचिरोली प्रादेशिक कार्यालयाचे विभागीय व्यवस्थापक आंबटवार उपस्थित होते. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या धानाचे ८ कोटी रूपये थकले असून शासन गुरूवारी जमा करणार असल्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर चक्काजाम आंदोलन मागे घेण्यात आले. त्याचबरोबर तालुक्यातील विविध समस्यांबाबत प्रभारी तहसीलदार, पोलीस उपनिरीक्षक संकुडे, संवर्ग विकास अधिकारी वैरागडे, सार्वजनिक बांधकाम विभाग, विद्युत विभाग व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली.
यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शामलाल मडावी, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रतापसिंह गजभिये, तालुका काँग्रेस उपाध्यक्ष मनोज अग्रवाल, हकीममुद्दीन शेख, सदरू भामानी, मेघश्याम जमकातन, प्रेमिला काटेंगे, ज्योती भैसारे, हर्षलता भैसारे, नरपतासिंग नैताम, शीतल नैताम, भजन मोहुर्ले, जीवन भैसारे, तुलाराम मडावी, धनसिंग कल्लो, तुळशिराम बावनथळे, रघुनाथ दरवडे, डॉ. बडोले, तिलक अठभैय्या, गोविंद होळी, राजाराम नैताम, चमरू कोरेटी, झाडूराम सलामे, मानसिंग नैताम यांच्यासह तालुक्यातील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Talk to tahsildars regarding cheating of the donation