शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
4
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
5
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
6
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
7
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
8
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
9
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
10
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
11
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
12
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
13
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
14
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
15
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
16
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
17
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
18
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
19
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
20
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
Daily Top 2Weekly Top 5

बियाणे विकणाऱ्या कृषी सहायकावर कारवाई करा

By admin | Updated: September 21, 2015 01:28 IST

शेतकऱ्यांसाठी आलेले बियाणे खुल्या बाजारात विक्री करणाऱ्या कृषी सहायक कोहाळकर यांच्यावर कारवाई करावी,..

शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा : तालुका कृषी अधिकाऱ्यांना निवेदनदेसाईगंज : शेतकऱ्यांसाठी आलेले बियाणे खुल्या बाजारात विक्री करणाऱ्या कृषी सहायक कोहाळकर यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी कोरेगाव, चोप, डोंगरमेंढा येथील शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. कृषी सहायक कोहाळकर यांनी कोरेगाव येथील नागरिक शामराव म्हस्के यांना हाताशी धरून खरीप, रब्बी व उन्हाळी हंगामासाठी आलेले बियाणे दामदुपटीने शेतकऱ्यांना विकले. शेतकऱ्यांनी याबाबत विचारणा केली असता, कोहाळकर यांनी शेतकऱ्यांनाच शेतकऱ्यानाच उडावाउडवीचे उत्तरे दिली व एकही कीटकनाशक व बियाणे शेतकऱ्यांना दिले नाही. संपूर्ण मालाचा साठा शामराव म्हस्के यांच्या घरी ठेवण्यात आला होता. शामराव म्हस्के हे गावात कृषीमित्र असल्याचे सांगून अनुदानित बियाणे आपल्याच मर्जीने वाटप करण्याचे आदेश कृषी सहायक कोहाळकर यांनी दिले असल्याचे सांगितले. शामराव म्हस्के यांनी स्वत:च लिहिलेला अहवाल कोहाळकर यांनी दिला. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषी असलेल्या कोहाळकर यांना निलंबित करून अटक करावी. त्याचबरोबर शासकीय मालमत्तेचा अपहार केल्याप्रकरणी शामराव म्हस्के यांच्यावरसुध्दा फौजदारी गुन्हा दाखल करून अटक करावी, अशी मागणी अनिल म्हस्के, रवींद्र नाकाडे, धनंजय दोनाडकर, जयंत भारती, पुरूषोत्तम भागडकर, रामदास दोनाडकर, विलास म्हस्के, लोमेश्वर म्हस्के, कृष्णा दोनाडकर, फाल्गुन नाकाडे यांनी केली आहे. याबाबत जिल्हा कृषी अधिकारी, जिल्हाधिकारी, आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार, खासदार, कृषीमंत्री, पालकमंत्री, पोलीस स्टेशन देसाईगंज यांच्याकडे निवेदन दिले आहे. कोहाळकर यांच्यावर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.