शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
4
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
5
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
6
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
7
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
8
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
9
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
10
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
11
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
12
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
13
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
14
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
15
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
16
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
17
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
18
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
19
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
20
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक पदोन्नती प्रक्रियेला स्थगिती

By admin | Updated: April 5, 2017 01:28 IST

जिल्हा परिषदेंतर्गत १९ व २० मार्च रोजी शिक्षण विभागाने पदवीधर तसेच विषय शिक्षकांची पदभरती केली होती.

पदवीधर शिक्षक : उच्च न्यायालयात सुनावणी गडचिरोली : जिल्हा परिषदेंतर्गत १९ व २० मार्च रोजी शिक्षण विभागाने पदवीधर तसेच विषय शिक्षकांची पदभरती केली होती. या पदभरतीला उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ४ एप्रिल रोजी स्थगिती दिली आहे. त्यामुळे शिक्षण विभागात एकच खळबळ माजली आहे. जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत असलेल्या पदवीधर प्राथमिक शिक्षक व विषय शिक्षक पदासाठी प्राथमिक शिक्षकांमधून पदोन्नती भरती प्रक्रिया राबविली. मात्र सदर भरती प्रक्रियेत बीएससी पदवीधरांना प्रथम प्राधान्य न देता १२ वी विज्ञान डीएडधारक शिक्षकांना विज्ञान विषय शिक्षक पदावर नेमण्यात आले. यामुळे शासनाच्या १३ आॅक्टोबर २०१६ व २४ जानेवारी २०१७ च्या परिपत्रकाचे उल्लंघन झाले होते. तसेच भरती प्रक्रिया राबविताना विषयवार याद्या तयार करण्यात आल्या नाही. सहा दिवसांपूर्वी अंतिम यादी प्रसिध्द केली नाही. वाढीव शैक्षणिक अहर्तेची मंजुरी न घेणाऱ्या शिक्षकांनाही नेमणूक देण्यात आली आहे. सेवा ज्येष्ठता यादीत घोळ झाला आहे. आंतर जिल्हा बदलीने बदलून आलेल्या शिक्षकांच्या सेवाज्येष्ठतेमध्ये चुका करणे तसेच यादीवर आक्षेप घेऊनही त्यामध्ये कोणतीही दुरूस्ती न करणे आदी त्रुटी पदोन्नतीदरम्यान आढळून आल्या. त्यामुळे विज्ञान पदवीधर शिक्षक विनोद रायपुरे व इतर सात जणांनी या पदोन्नती प्रक्रियेविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेची सुनावणी न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व अतुल चांदुरकर यांच्या खंडपीठाने ४ एप्रिल रोजी केली. खंडपीठाने या प्रकरणात जैसे थे चा आदेश दिला आहे. याचिकाकर्त्याची बाजू अ‍ॅड. प्रदीप क्षीरसागर यांनी मानले. न्यायालयाच्या स्थगितीबाबत उपशिक्षणाधिकारी एम. एन. चलाख यांना विचारणा केली असता, स्थगितीची माहिती आपल्या कानावर पडली आहे. मात्र स्थगितीबाबतचे कोणतेही अधिकृत दस्तावेज शिक्षण विभागाला प्राप्त झालेले नाहीत, अशी माहिती लोकमत प्रतिनिधींशी बोलताना दिली. (नगर प्रतिनिधी)