गटशिक्षणाधिकाऱ्यांना निलंबित करा

By Admin | Updated: May 27, 2015 01:42 IST2015-05-27T01:42:28+5:302015-05-27T01:42:28+5:30

धानोरा पंचायत समितीचे तत्कालीन गटशिक्षणाधिकारी सुधीर आखाडे यांच्यावर चौकशीअंती दोष सिद्ध झाला आहे.

Suspend group officials | गटशिक्षणाधिकाऱ्यांना निलंबित करा

गटशिक्षणाधिकाऱ्यांना निलंबित करा

गडचिरोली : धानोरा पंचायत समितीचे तत्कालीन गटशिक्षणाधिकारी सुधीर आखाडे यांच्यावर चौकशीअंती दोष सिद्ध झाला आहे. मात्र त्यांच्यावर अजूनपर्यंत निलंबनाची कारवाई करण्यात आलेली नाही. कारवाई न झाल्यास महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद तीव्र आंदोलन करेल, असा इशारा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना २५ मे रोजी दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे.
प्राथमिक शिक्षकांचे वेतन एप्रिल व मे २०१५ तत्काळ करण्यात यावे, वेतन दिरंगाईमुळे शिक्षकांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. नाहक व्याजाचे भूर्दंड सहन करावे लागत आहे, वेतन तत्काळ अदा करण्याची व्यवस्था करण्यात यावी, अन्यथा ३० मे पासून आंदोलन केले जाईल, असा इशारा परिषदेने दिला आहे. जि. प. स्तरावर प्रलंबित भविष्य निर्वाह निधीचे प्रकरण तत्काळ निकाली काढून शिक्षकांना त्याचा लाभ देण्यात यावा, तसेच भामरागड पं. स. तील कार्यरत मृतक शिक्षक राजू बत्तुलवार यांचे सेवानिवृत्ती प्रकरण मागील दोन वर्षांपासून प्रलंबित आहे. गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या दुर्लक्षिपणामुळे बत्तुलवार कुटुंबीयांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, असेही शिक्षक परिषदेने या निवेदनात म्हटले आहे.
आखाडे हे गटशिक्षणाधिकारी असताना त्यांनी नियमबाह्य बदल्या व समायोजन करून शिक्षकांचे वेतन काढले आहे. याची चौकशी करून संबंधितांना कारणे दाखवा नोटीस बजावली. त्यानंतर त्यांनी बदली समायोजन झाले नाही, असे भासविण्याचा प्रयत्न केला. कार्यालयाची दिशाभूल केली. या प्रकरणी त्यांच्यावर कारवाई होणे आवश्यक आहे. तसेच यावर्षीचे आपसी बदल्यांचे धोरणही स्पष्ट करण्यात यावे, अशी मागणी शिक्षक परिषदेने केली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Suspend group officials