शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

भामरागड-एटापल्ली मार्गाचा सर्व्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2019 06:00 IST

भामरागड-एटापल्ली मार्ग दोन्ही तालुक्यातील नागरिकांसाठी सोयीचा आहे. दोन्ही तालुक्याला जोडणाºया रस्त्यावर जांभिया गट्टा हे गाव एटापल्ली तालुक्याच्या शेवटच्या टोकावर आहे. या गावातूनच अनेक कर्मचारी तालुका मुख्यालयात ये-जा करीत असतात. परिसरातील ३० गावांसाठी हे मध्यवर्ती ठिकाण आहे तर भामरागड तालुक्यातील कोठी हे गाव तालुक्यातील मोठे गाव आहे.

ठळक मुद्दे७० किमी रस्ता । पावसाळ्यात दरवर्षी नागरिकांना वाहतुकीस होतो त्रास

लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : भामरागड-एटापल्ली या दोन तालुक्याला जोडणाऱ्या रस्त्यांचे अंतर ७० किमीचे आहे. परंतु या मार्गाची अत्यंत दुरवस्था झाली आहे. या मार्गावरील नदी, नाल्यांवर अनेक वर्षांपासून पुराची प्रतीक्षा आहे. परंतु काही दिवसांपासून रस्ताव पुलाचे काम सुरू करण्याच्या दृष्टीने सर्वेक्षण सुरू असल्याने या भागातील नागरिकांमध्ये पक्क्या रस्त्याची आशा निर्माण झाली आहे.भामरागड-एटापल्ली मार्ग दोन्ही तालुक्यातील नागरिकांसाठी सोयीचा आहे. दोन्ही तालुक्याला जोडणाºया रस्त्यावर जांभिया गट्टा हे गाव एटापल्ली तालुक्याच्या शेवटच्या टोकावर आहे. या गावातूनच अनेक कर्मचारी तालुका मुख्यालयात ये-जा करीत असतात. परिसरातील ३० गावांसाठी हे मध्यवर्ती ठिकाण आहे तर भामरागड तालुक्यातील कोठी हे गाव तालुक्यातील मोठे गाव आहे. जांभिया गट्टा व कोठी या गावातील अंतर १८ किमी असून या दोन्ही गावात दोन नाले आहेत. या दोन्ही नाल्यावर १९९६-९७ मध्ये बीआरओच्या माध्यमातून पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले होते. परंतु नक्षल्यांच्या भीतीमुळे पुलाचे अर्धवटच बांधकाम करण्यात आले. काम अर्धवट सोडून बीआरओ परत गेले. त्यामुळे एका पुलाचे पिलरपर्यंत सुद्धा काम झाले नाही. तेव्हापासून नक्षल्यांचया भीतीमुळे सदर पुलाचे बांधकाम करण्यास कंत्राटदार धजावत नाही. त्यामुळे पावसाळ्यात येथून भरपूर पाणी वाहत असते. जवळपास दोन ते तीन महिने वाहतूक ठप्प असते. एटापल्लीवरून गट्टापर्यंत बससेवा आहे. याशिवाय भामरागडपासून कोठीपर्यंत बससेवा असल्याने नागरिकांसाठी सोय झाली आहे. परंतु दुर्गम भागात पक्क्या रस्त्यांचा अभाव असल्याने तसेच नाल्यांवर पूल नसल्याने बससेवा उपलब्ध नाही.४० गावांसाठी सोयभामरागड-एटापल्ली मार्गाचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे भामरागड तालुक्यातील कारमपल्ली, कियर, हलवेर, नारगुंडा, पिडमिली, कोठी, मरकणार, तुंबरकोठी, मुरूमबुसी, तोयनार तसेच एटापल्ली तालुक्यातील गट्टा, जांभिया, आलेंगा, सुरजागड, मंगेर, नेंडेर, परसलगोंदी, तुमरगुंडा, आलदंडी परिसरातील एकूण ४० गावांच्या विकासाला गती मिळणार आहे. रस्त्याचे बांधकाम सुरू होणे आवश्यक आहे. रस्त्याचे काम सुरू होण्याची प्रतीक्षा परिसरातील नागरिकांना आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक