बुडीत मजुरीचे साडेनऊ लाख रूपये पडून

By Admin | Updated: July 22, 2015 02:31 IST2015-07-22T02:31:08+5:302015-07-22T02:31:08+5:30

सन २०१४-१५ या वर्षात ३०० हून अधिक गरोदर मातांसाठी मंजूर करण्यात आलेला ९ लाख ६० हजार रूपयांचा निधी पंचायत समिती कार्यालयात पडून

Suddenly Rs. 100 lacs of laborers fall | बुडीत मजुरीचे साडेनऊ लाख रूपये पडून

बुडीत मजुरीचे साडेनऊ लाख रूपये पडून

गरोदर व स्तनदा माता वंचित : एटापल्ली पंचायत समितीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर
एटापल्ली : सन २०१४-१५ या वर्षात ३०० हून अधिक गरोदर मातांसाठी मंजूर करण्यात आलेला ९ लाख ६० हजार रूपयांचा निधी पंचायत समिती कार्यालयात पडून असल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. परिणामी तालुक्यातील गरीब गरजू गरोदर माता बुडीत मजुरीच्या रकमेपासून वंचित आहेत.
राज्य शासनाच्या निर्णयानुसार मानव विकास मिशनच्या माध्यमातून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व दारिद्र्य रेषेखालील इतर मागास प्रवगाच्या गरोदर माताना प्रसुतीपूर्व दोन हजार रूपये, प्रसुतीनंतर दोन हजार असे एकूण चार हजार रूपये बुडीत मजुरी देण्याची तरतूद आहे. एटापल्ली पंचायत समितीला शासनाकडून २०१४-१५ या वर्षाचा बुडीत मजुरीचा ९ लाख ६० हजार रूपयांचा निधी शासनाकडून २२ डिसेंबर २०१४ रोजी मिळाला. सदर निधी पंचायत समितीच्या बीडीएसवर उपलब्ध असल्याची माहिती आहे. एटापल्ली तालुक्यातील तोडसा, गट्टा, कसनसूर या तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या गावातील गरोदर मातांना बुडीत मजुरी देणे, शून्य ते सहा वयोगटातील बालकांची तपासणी करणे, गरोदर माता व स्तनदा मातांची तपासणी शिबिर आयोजित करून सदर निधी खर्च करावयाचा आहे. मात्र एटापल्ली पंचायत समिती प्रशासनाकडून ९ लाख ६० हजार रूपयांचा निधी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना वर्ग करण्यात आला नाही. त्यामुळे तालुक्यातील तीन आरोपी केंद्रांतर्गत ३६ उपकेंद्र व २०० च्या वर गावातील जवळपास ३३२ गरोदर व स्तनदा माता बुडीत मजुरीच्या लाभापासून वंचित आहे. या संदर्भात जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन बुडीत मजुरीची रक्कम अदा करण्याच्या कार्यवाहीचे पंचायत समिती प्रशासनाला निर्देश द्यावे, अशी मागणी मातांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Suddenly Rs. 100 lacs of laborers fall