शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी जाणली पोलीस प्रणाली

By admin | Updated: January 3, 2015 23:03 IST

महाराष्ट्र पोलीस दलाच्यावतीने २ जानेवारीपासून जागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर सप्ताह ८ जानेवारीपर्यंत चालणार आहे. या सप्ताहाचा एक भाग म्हणून शनिवारी

गडचिरोली : महाराष्ट्र पोलीस दलाच्यावतीने २ जानेवारीपासून जागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर सप्ताह ८ जानेवारीपर्यंत चालणार आहे. या सप्ताहाचा एक भाग म्हणून शनिवारी शहर पोलीस ठाण्यात शहरातील अनेक शाळांच्या विद्यार्थ्यांनी पोलीस प्रणालीविषयी माहिती जाणून घेतली. यात विद्यार्थ्यांनी शस्त्रास्त्र, स्फोटके, डॉगस्कॉड, ब्रिग्रेड, स्टेशन डायरी, वायरलेस यंत्रणा याविषयी माहिती जाणून घेतली.
पोलीस ठाण्यात पार पडलेल्या कार्यक्रमाला उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. राहुल खाडे, पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर, पोलीस उपनिरीक्षक अंकुश माने, दिंडुरे, गांगलवार, मुनगेलवार, वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक प्रशांत कांबळे, पवन पाटील, विजय कुळमेथे उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांना डॉगस्कॉड तसेच श्वान पथकातील कुत्र्यांच्या प्रकाराविषयी माहिती देण्यात आली. त्यानंतर ठाणेदार बेसरकर यांनी विद्यार्थ्यांना शस्त्रास्त्रांच्या प्रकाराविषयी तसेच इतर माहिती दिली. दरम्यान विद्यार्थ्यांना वायरलेस यंत्रणा, स्टेशन डायरी, एफआयआर, पोलीस वाहन याविषयी माहिती देण्यात आली. सप्ताहादरम्यान जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्याअंतर्गत जनजागृती, सुरक्षेसंदर्भात व्याख्यान, कार्यशाळा, सुरक्षेविषयी माहिती, समूपदेशन कार्यशाळा आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी पोलीस ठाण्यातील क्राईम विभाग, गोपनीय शाखा, सीसीटीएनएस, हॅन्डग्रीनेड याविषयी माहिती जाणून घेतली. विद्यार्थ्यांनी पोलीस यंत्रणेला न घाबरता पोलिसांना सहकार्य करण्याची वृत्ती अंगी बानवावी, तसेच व्यक्तिमत्व विकासावर भर द्यावा, असे आवाहन डॉ. राहुल खाडे यांनी केले.
कार्यक्रमात शिवाजी महाविद्यालय, शिवाजी सायन्स कॉलेज, कारमेल हायस्कूल येथील विद्यार्थी सहभागी झाले होते. त्याबरोबरच शिक्षक एम. जे. पदा, आर. एस. करकाडे उपस्थित होते.