शहरं
Join us  
Trending Stories
1
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
2
Top Marathi News LIVE Updates: मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारला मोठं 'बळ', बहुमत चाचणीआधी तामिळनाडूत मोठी घडामोड
3
सोनं खरेदी करू नका, असं आवाहन इंदिरा गांधींनी खरंच केलं होतं का?; व्हायरल कात्रणामागचं सत्य काय?
4
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
5
Travel : भारताच्या 'मिनी थायलंड'पासून अवघ्या ३ तासांवर आहे 'हे' सुंदर ठिकाण; निसर्गात रमून थकवा विसराल!
6
‘सनातन धर्माला संपवलंच पाहिजे’, विजय यांच्यासमोर उदयनिधींचं विधान, मुख्यमंत्र्यांनी दिला असा प्रतिसाद
7
कल्याणमध्ये ७८ वर्षीय भोंदूबाबाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
8
NEET Exam Paper Leak : "पप्पा, हाच पेपर येईल, हॉस्टेलमधील मुलींना द्या"; NEET चं केरळ कनेक्शन, १८० पैकी १३० प्रश्न लीक
9
कान्समध्ये अवतरली जणू स्वप्नातील परी! मिंट-ग्रीन गाऊनमध्ये आलिया भट्टचा 'प्रिन्सेस लूक' व्हायरल
10
Vastu Shastra: घरात पैसे टिकत नाहीत? मग चुकूनही 'या' दिशेला ठेवू नका तुमची तिजोरी!
11
सीजफायरचा फक्त देखावा! इराणने रशिया-चीनकडून जमवला शस्त्रास्त्रांचा डोंगर; 'या' देशांना दिला इशारा
12
ज्याने कपाटात 'सीक्रेट' कप्पा बनवला, त्यानेच हात साफ केला! ३० लाखांची चोरी करून कारागिर फरार
13
Gold Import: सोन्याच्या आयातीमुळे देशाच्या तिजोरीवर पडला मोठा भार, सोन्याने भारताची चिंता का वाढवलीये?
14
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
15
मोठी बातमी: पेपर फुटला, नीट २०२६ ची परीक्षा रद्द, सीबीआय चौकशीचे आदेश
16
अनधिकृत बाइक टॅक्सी ॲप्सवर कारवाईचे आदेश; प्रताप सरनाईक यांचे सायबर क्राइम विभागाला पत्र
17
बुधवारी अपरा एकादशी २०२६: ‘असे’ करा व्रत पूजन, शुभ मुहूर्त काय? पाहा, महत्त्व अन् मान्यता
18
देश प्रथम! PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; मंत्री शंभूराज देसाईंचा लंडन-पॅरिस दौरा रद्द
19
भाजप नेत्यांनी ५० गाड्यांच्या ताफ्यासह भोपाळला काढली रॅली, PM मोदींचं आवाहन नेते दुसऱ्याच दिवशी विसरले!
20
'या' Infra कंपन्यांची लागली लॉटरी! ११ हजार कोटींचा प्रोजेक्ट मिळताच स्टॉक सुस्साट, हाती आला रेल्वे-हायवेचा प्रोजेक्ट
Daily Top 2Weekly Top 5

जात पडताळणीसाठी विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 05:01 IST

बारावीच्या निकालामुळे त्यासाठी जिल्हास्तरावरील अनुसूचित जमाती व इतर प्रवर्गांसाठी असलेल्या पडताळणी समितीच्या कार्यालयात विद्यार्थ्यांचे ऑनलाईन प्रस्ताव येणे सुरू झाले आहे. पण लॉकडाऊनमुळे बसगाड्या बंद असल्यामुळे गडचिरोलीच्या व चंद्रपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना कागदपत्रांच्या तपासणीसाठी गडचिरोलीत येणे अवघड झाले आहे.

ठळक मुद्दे४५६ प्रस्ताव प्रलंबित : लॉकडाऊनमुळे कागदपत्रांसह स्वत: कार्यालयात येणे होत आहे कठीण

दिलीप दहेलकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेसह पदवी, पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र आवश्यक आहे. काही दिवसांपूर्वीच लागलेल्या बारावीच्या निकालामुळे त्यासाठी जिल्हास्तरावरील अनुसूचित जमाती व इतर प्रवर्गांसाठी असलेल्या पडताळणी समितीच्या कार्यालयात विद्यार्थ्यांचे ऑनलाईन प्रस्ताव येणे सुरू झाले आहे. पण लॉकडाऊनमुळे बसगाड्या बंद असल्यामुळे गडचिरोलीच्या व चंद्रपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना कागदपत्रांच्या तपासणीसाठी गडचिरोलीत येणे अवघड झाले आहे.
गतवर्षी व यावर्षीचे मिळून दोन्ही समिती कार्यालयाकडे जवळपास ४५६ प्रस्ताव प्रलंबित आहेत. ओबीसी, एससी, एनटी, एसबीसी, व्हीजेएनटी आदी प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी गडचिरोली येथे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे कार्यालय आहे. गतवर्षी सन २०१९-२० या वर्षात विविध अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचे एकूण दोन हजार प्रस्ताव या कार्यालयाकडे सादर करण्यात आले. त्यापैकी समितीने पडताळणी करून व दस्तावेजाची तपासणी करून १ हजार ८०० प्रस्ताव निकाली काढले. आता त्रुटींमुळे २०० प्रस्ताव प्रलंबित आहेत.
गडचिरोली येथील अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती कार्यालयाकडे गडचिरोली आणि चंद्रपूर या दोन्ही जिल्ह्यातील प्रस्ताव येतात. जानेवारी २०१९ ते जुलै २०२० या दीड वर्षाच्या कालावधीत विद्यार्थ्यांचे एकूण १ हजार ४३२ प्रस्ताव आले. त्यापैकी १ हजार १७६ प्रस्ताव निकाली काढण्यात आले तर २५६ प्रस्ताव प्रलंबित आहेत.
यावर्षीच्या नवीन प्रस्तावांची भर आता पडणे सुरू झाले आहे. आधी विद्यार्थी ऑनलाईन प्रस्ताव सादर करतात. त्यानंतर कागदपत्रे घेऊन स्वत: या कार्यालयात जावे लागते. पण बसफेऱ्याच बंद असल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना यासाठी येणे अशक्य होत आहे.
कोरोना लॉकडाऊनच्या काळात मोजक्याच मार्गावर एसटी बसफेºया सुरू आहेत. त्यामुळे दोन्ही समिती कार्यालयाच्या वतीने गडचिरोली जिल्ह्याच्या अहेरी उपविभाग व उत्तर भागातील विद्यार्थ्यांसाठी, तसेच अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी चंद्रपूर जिल्ह्यात उपकेंद्र निर्माण करून प्रस्ताव निकाली काढणे ग्रजेचे आहे.

जात प्रमाणपत्र पडताळणीची प्रक्रिया ऑनलाईन करण्याचे नियोजन होते. मात्र तशा स्पष्ट सूचना प्राप्त झाल्या नाही. जिल्हास्तरावरील समितीच्या कार्यालयात हार्डकॉपीसह प्रस्ताव स्वीकारणे सुरू झाले आहे. जिल्हाभरातून दरवर्षी २००० ते २२०० विद्यार्थ्यांचे प्रस्ताव येतात. जुलैपासून प्रस्ताव येण्यास सुरूवात होते. ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात अधिक प्रस्ताव येतात. बार्टी कार्यालयाच्या मार्गदर्शनानुसार, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे प्रस्ताव स्वीकारण्यासाठी अहेरी उपविभागात शिबिर घेता येईल.
- राजेश पांडे, उपायुक्त, जिल्हा जात प्रमाणपत्र
पडताळणी समिती कार्यालय, गडचिरोली

टॅग्स :Studentविद्यार्थी