शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

एसटीचे विभागीय कार्यालय नावापुरतेच

By admin | Updated: September 29, 2014 00:44 IST

नागरिक व लोकप्रतिनिधी यांच्या सततच्या मागणीनंतर गडचिरोली येथे एसटीचे विभागीय कार्यालय सुरू करण्यात आले असले तरी या कार्यालयाचा भार केवळ १५ कर्मचारी सांभाळत असून

गडचिरोली : नागरिक व लोकप्रतिनिधी यांच्या सततच्या मागणीनंतर गडचिरोली येथे एसटीचे विभागीय कार्यालय सुरू करण्यात आले असले तरी या कार्यालयाचा भार केवळ १५ कर्मचारी सांभाळत असून विभागीय नियंत्रकाचे पदसुद्धा रिक्त आहे. त्यामुळे सदर कार्यालय केवळ नावापुरतेच सुरू करण्यात आले असल्याची टीका नागरिकांकडून केली जात आहे. गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली व अहेरी येथे आगार आहेत. त्याचबरोबर गडचिरोली जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन एसटीबाबतचे स्वतंत्र निर्णय घेण्याच्या उद्देशाने गडचिरोली येथे विभागीय कार्यालय सुरू करण्यात यावे, अशी मागणी सातत्याने लावून धरण्यात आली. त्यानंतर एसटीने गडचिरोली, अहेरी व ब्रह्मपुरी या तीन आगारांसाठी स्वतंत्र गडचिरोली येथे विभागीय कार्यालय सुरू केले. या विभागीय कार्यालयांतर्गत तिनही आगाराचे मिळून जवळपास १ हजार कर्मचारी व ३०० एसटी बसेस आहेत. यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी विभागीय कार्यालयाची आहे. त्याचबरोबर एसटीचे योग्य व्यवस्थापन करण्याची जबाबदारी सुद्धा विभागीय कार्यालयाची आहे. हे लक्षात घेऊनच या कार्यालयात जवळपास ८० पदे मंजूर करण्यात आली आहेत. मात्र सध्य:स्थितीत या कार्यालयात केवळ १५ कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्ये वाहतूक शाखेत ७, आस्थापना विभागात ६ व अकॉऊंट विभागात २ असे एकूण केवळ १५ कर्मचारी कार्यरत आहेत. या कार्यालयाचे प्रमुख अधिकारी विभागीय नियंत्रक यांना १५ दिवसापूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी लाच घेतांना अटक केली. त्यानंतर चवरे यांना निलंबित करण्यात आले. तेव्हापासून विभागीय नियंत्रकाचे पद रिक्त झाले आहे. मुख्य अधिकारीच नसल्याने याबाबतचे निर्णय घेण्यास सुद्धा अडचण जात आहे. विभागीय कार्यालय सुरू केले असले तरी या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत नाही. त्यामुळे आगारातील एका खोलीतून विभागीय कार्यालयाचा कारभार सांभाळला जात आहे. विभागीय कार्यालयाच्या अखत्यारिमध्ये वर्कशॉप व स्टोअर असणे गरजेचे आहे. मात्र हे दोन विभाग गडचिरोली येथे आणण्याबाबतचा अजून कोणताच निर्णय एसटीने घेतला नाही. त्यामुळे विभागीय कार्यालय सुरू झाले असले तरी एसटी वाहनामध्ये बिघाड निर्माण झाल्यास सदर वाहन चंद्रपूर येथील वर्कशॉपमध्येच नेऊन दुरूस्त करावे लागते. त्याचबरोबर साहित्य सुद्धा चंद्रपूर येथूनच आणावे लागत असल्याने विभागीय कार्यालयाचा फायदा काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (नगर प्रतिनिधी)