शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

महादेवगड पहाडी रस्त्याचे मजबुतीकरण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:34 IST

जोगीसाखरा : आरमोरी तालुक्यातील पळसगाव-अरतताेंडी महादेवगड या चार किमी रस्त्याचे मजबुतीकरण करावे, अशी मागणी देवस्थान कमिटी व भाविकांनी केली ...

जोगीसाखरा : आरमोरी तालुक्यातील पळसगाव-अरतताेंडी महादेवगड या चार किमी रस्त्याचे मजबुतीकरण करावे, अशी मागणी देवस्थान कमिटी व भाविकांनी केली आहे.

पळसगाव-अरततोंडी जुनी पहाडीवर शंकर महादेवाचे देवस्थान आहे. गेल्या दहा वर्षांपासन शेकडो किमी अंतर प्रवास करुन भाविक महादेवाच्या दर्शनाकरिता येतात. दोन्ही गावाच्या पुढाकाराने भागवत सप्ताहदेखील येथे पाळला जाताे. आजी-माजी लोकप्रतिनिधी आणि दानशूर व्यक्तींच्या पुढाकाराने आजपर्यंत विद्युत व्यवस्थेपासून ते काही प्रमाणात पायऱ्या, पाणी व निवासस्थानाची व्यवस्था झाली आहे. २०१७-१८ मध्ये जुन्या पांदण रस्त्यावर ग्रामीण राेजगार हमी याेजनेतून मातीकाम व मुरुम टाकण्यात आला. परंतु अजूनही छोट्या छोट्या नाल्यांवर मोरी बांधकाम झालेले नाही. तसेच भाविकांच्या वर्दळीमुळे महाशिवरात्रीला व भागवत सप्ताहाच्या वेळी प्रचंड गर्दी राहते. मार्ग कच्चा असल्याने धुळीचा त्रास सहन करावा लागतो. धुळीमुळे शारीरिक हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महादेवगड पहाडीचा विकास व पर्यटनस्थळ म्हणून विकास होण्याकरिता देवस्थानपर्यंत मजबूत रस्त्याची आवश्यकता आहे. शासनाने महादेवगड पांदण रस्त्याचे मजबुतीकरण लवकर करावे, अशी मागणी देवस्थान कमिटी व भाविकांनी केली आहे.