शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

अळींबी उत्पादनावर भर

By admin | Updated: January 3, 2015 23:02 IST

डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठांतर्गत येणाऱ्या कृषी विज्ञान केंद्र व कृषी महाविद्यालय गडचिरोली येथे डॉ. पंजाबराव देशमुख कृषक विज्ञान मंचची ९० वी सभा पार पडली. या सभेत अळींबी उत्पादन

गडचिरोली : डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठांतर्गत येणाऱ्या कृषी विज्ञान केंद्र व कृषी महाविद्यालय गडचिरोली येथे डॉ. पंजाबराव देशमुख कृषक विज्ञान मंचची ९० वी सभा पार पडली. या सभेत अळींबी उत्पादन वाढविण्यावर भर देण्यात आला. अळींबीचे उत्पादन वाढवून फायदेशीर लघुउद्योग निर्माण करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
सभेच्या अध्यक्षस्थानी डॉ. पुरूषोत्तम नेहरकर होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. गणेश भगत, डॉ. सुहास मोरे, डॉ. शुभांगी अलेक्झांडर, प्रा. संदीप कऱ्हाळे उपस्थित होते. कार्यक्रमादम्यान क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. डॉ. पंजाबराव देशमुख यांनी शेतीचे महत्व देशाला पटवून दिले. तर सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचे महत्व पटवून दिले. त्यामुळे कृषी व समाज परिवर्तनाचा पाया रोवला गेला, असे उद्गार डॉ. पुरूषोत्तम नेहरकर यांनी काढले.
डॉ. भगत यांनी उन्हाळी भात लागवड तसेच भुईमूग लागवड तंत्रज्ञान याविषयी माहिती दिली. शिक्षण हा कृषीचा अविभाज्य घटक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अभ्यासूवृत्तीने शेती करावी, असे आवाहन डॉ. सुहास मोरे यांनी केले. सभेला तालुक्यातील ५० हून अधिक शेतकरी उपस्थित होते. यावेळी कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी व कर्मचारीही उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रा. संदीप कऱ्हाळे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी देवराव ठाकरे, बाबुराव भोयर, निर्मला रेचनकार यांच्यासह कृषी विज्ञान केंद्रातील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)