शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

एसटीचे स्टेअरिंग जाणार नवीन चालकांच्या हाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2022 05:00 IST

एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावे, यासाठी मागील अडीच महिन्यांपासून काही एसटी कर्मचारी आंदाेलन करीत आहेत. शासनाने पगारवाढ केल्यानंतर काही कर्मचारी रुजू हाेण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील २५० एसटी आगारांपैकी २१५ आगारांमध्ये अंशत: एसटीची सेवा सुरू झाली आहे. आंदाेलनकर्त्या कर्मचाऱ्यांनी रुजू व्हावे, यासाठी शासनाने वेळाेवेळी आवाहन केले. मात्र, अजूनही काही कर्मचारी आंदाेलनात कायम आहेत. शासनाने नवीन चालकांची नियुक्ती करण्यास सुरुवात केली आहे. 

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : एसटीमध्ये नवीन चालकांची भरती करण्यास सुरुवात झाली आहे. काही जिल्ह्यांमध्ये नवीन चालक रुजू झाले आहेत. गडचिराेली विभागीय कार्यालयाने ५० चालकांची मागणी एसटी व्यवस्थानाकडे केली आहे.  नवीन चालक लवकरच रुजू हाेतील अशी माहिती एसटीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावे, यासाठी मागील अडीच महिन्यांपासून काही एसटी कर्मचारी आंदाेलन करीत आहेत. शासनाने पगारवाढ केल्यानंतर काही कर्मचारी रुजू हाेण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील २५० एसटी आगारांपैकी २१५ आगारांमध्ये अंशत: एसटीची सेवा सुरू झाली आहे. आंदाेलनकर्त्या कर्मचाऱ्यांनी रुजू व्हावे, यासाठी शासनाने वेळाेवेळी आवाहन केले. मात्र, अजूनही काही कर्मचारी आंदाेलनात कायम आहेत. शासनाने नवीन चालकांची नियुक्ती करण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, नागपूर या प्रत्येक विभागामध्ये ५० नवीन चालकांची नियुक्ती केली आहे. काही चालक रुजू झाले आहेत. गडचिराेली एसटी विभागातही नवीन चालक रुजू हाेण्याची शक्यता आहे.

गडचिराेली आगारात पाच बसेस सुरू गडचिराेली आगारात पाच चालक व तेवढेच वाहक रुजू झाले आहेत. त्यामुळे मागील आठ दिवसांपासून पाच बस सुरू आहेत. अहेरी आगारात एक बस सुरू आहे. मात्र अजून गर्दीच्या मार्गावर बसगाड्यांची प्रतीक्षा कायम आहे. त्यामुळे नवीन चालक रूजू हाेताच त्या फेऱ्या धावतील.

आंदाेलनकर्त्यांचे मन वळविणे सुरूच ज्या कर्मचाऱ्यांवर काेणतीही कारवाई करण्यात आली नाही त्यांनी रुजू व्हावे यासाठी एसटीचे अधिकारी त्यांची भेट घेऊन मन वळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, विलीनीकरणाचे भूत अजूनही कर्मचाऱ्यांच्या मनातून निघाले नसल्याने ते कामावर रुजू हाेण्यास तयार नाहीत. 

आंदाेलकांमध्ये अस्वस्थता शासन नवीन भरती करणार नाही, असे आंदाेलनकर्त्या कर्मचाऱ्यांना वाटत हाेते. मात्र, शासनाने नवीन भरती करण्यास सुरुवात केली आहे. नवीन चालक रुजू हाेत आहेत. कारवाई झालेल्या कर्मचाऱ्यांना कामावर घेणार की नाही, हे अजूनही शासनाने स्पष्ट केले नाही. त्यामुळे कारवाई झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

 

टॅग्स :ST Strikeएसटी संप