चामाेर्शी मार्गाचे आठ दिवसात काम सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:52 IST2021-02-05T08:52:33+5:302021-02-05T08:52:33+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क गडचिराेली : गडचिराेली शहरातील चामाेर्शी मार्गाच्या सिमेंट काँक्रिटीकरणाला सुरुवात करावी, अन्यथा तीव्र आंदाेलन करण्याचा इशारा युवक ...

Start work on the Chamarshi route in eight days | चामाेर्शी मार्गाचे आठ दिवसात काम सुरू करा

चामाेर्शी मार्गाचे आठ दिवसात काम सुरू करा

लाेकमत न्यूज नेटवर्क

गडचिराेली : गडचिराेली शहरातील चामाेर्शी मार्गाच्या सिमेंट काँक्रिटीकरणाला सुरुवात करावी, अन्यथा तीव्र आंदाेलन करण्याचा इशारा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी दिला आहे. गडचिराेली ते चामाेर्शी या राष्ट्रीय महामार्गाच्या सिमेंट काँक्रिटीकरणाला मंजुरी मिळाली आहे. कंत्राटदाराने गडचिराेली शहरातून एक बाजू बनविली आहे. याला आता सहा महिन्यापेक्षा अधिक कालावधी उलटला आहे. मात्र कंत्राटदाराने दुसरी बाजूस सुरुवात केली नाही. एकाच बाजूने वाहने जात असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. दुसरी बाजू अतिशय खड्डेमय झाली आहे. तसेच धुळीच्या त्रासामुळे दुकानदार, सभाेवतालच्या घरांमधील नागरिक त्रस्त झाले आहेत. गडचिराेली शहराच्या बाहेर रस्त्याचे काम सुरू आहे. गडचिराेली शहरातील वर्दळ लक्षात घेता, या कामाला प्राधान्य देण्याची गरज हाेती. मात्र अजूनपर्यंत कामाला सुरुवात केली नाही.

Web Title: Start work on the Chamarshi route in eight days