शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

कापूस खरेदी केंद्र सुरू करा

By admin | Updated: October 25, 2014 01:25 IST

गडचिरोली जिल्ह्यात गेल्या चार-पाच वर्षात कापसाचा पेरा प्रचंड प्रमाणात वाढला आहे. जिल्ह्याच्या पाच ते सहा तालुक्यातील ...

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात गेल्या चार-पाच वर्षात कापसाचा पेरा प्रचंड प्रमाणात वाढला आहे. जिल्ह्याच्या पाच ते सहा तालुक्यातील शेतकरी कापसाचे नगदी पीक घेऊ लागले आहे. मात्र जिल्ह्यात कापूस खरेदीचे एकही केंद्र नसल्याने शेतकऱ्यांना आपला कापूस आंध्र प्रदेश किंवा मध्य प्रदेशात नेऊन विकावा लागत आहे. राज्य शासनाने गडचिरोली जिल्ह्यात सीसीआय किंवा राज्य सरकारच्या पणन योजनेंतर्गत कापूस खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे.गडचिरोली जिल्ह्यात अहेरी, सिरोंचा, मुलचेरा, चामोर्शी या तालुक्यांमध्ये कापसाची लागवड शेतकरी मोठ्या प्रमाणावर करीत आहे. आता जिल्ह्यात कापसाचे लागवडी क्षेत्र हे ५०० ते ६०० हेक्टरच्या घरात आहे. कापूस क्षेत्र वाढविण्यासाठी गेल्या चार-पाच वर्षात कृषी विभागाने जोमाने प्रयत्न केल्याने शेतकरी कापसाकडे वळला. परंतु उत्पन्न झालेला कापूस विकण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात बाजारपेठ नाही. विदर्भात वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, अकोला, बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये खासगी सुतगिरण्या तसेच खासगी व्यापारी कापसाची खरेदी मोठ्या प्रमाणावर करतात. राज्य व केंद्र सरकारही आपल्यामार्फत येथे कापूस खरेदी केंद्र सुरू करून कापसाची खरेदी करीत असते. मात्र गडचिरोली जिल्ह्यात उच्चप्रतीच्या कापसाचे उत्पन्न होऊनही येथे कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले नाही. २००७-०८ मध्ये तत्कालीन राज्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धर्मरावबाबा आत्राम यांच्या प्रयत्नातून कापूस पणन महासंघाचे तात्पुरते कापूस खरेदी केंद्र सिरोंचा येथे सुरू करण्यात आले होते. त्यावर्षी या केंद्रावर मोठ्या प्रमाणावर कापसाची खरेदी झाली होती. मात्र त्यानंतर हे केंद्र राज्य सरकारने गुंडाळले. दोन वर्षांपूर्वी अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीने पांढुर्णा येथील व्यापारी बोलावून त्यांच्यामार्फत कापूस खरेदी केंद्र सुरू केले होते. येथे ४०० वर क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली होती. राज्य सरकारने गडचिरोली जिल्ह्यासाठी अहेरी किंवा सिरोंचा येथे जिनिंग प्रेसिंग फॅक्ट्री उभारून कायमस्वरूपी कापूस खरेदी केंद्र सुरू करावे, अशी या भागातील कापूस उत्पादकांची मागणी आहे. नव्या लोकप्रतिनिधींनी याकरिता शासनाकडे पाठपुरावा करावा, अशीही मागणी कापूस उत्पादकांनी केली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)